Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आजच्या आकडेवारीत पुन्हा घट

पारनेर टॉपवर; संगमनेर दुसर्‍या तर पाथर्डी तिसर्‍या क्रमांकावर

अहमदनगर । वीरभूमी- Aug 16, 2021 • 12:00 AM 1971 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा दोन दिवसापासून हळू हळू कमी होऊ लागला आहे. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत आहे. आज सोमवारी जिल्ह्यात एकुण 757 कोरोना बाधित आढळले.

आज आढळलेल्या आकडेवारीत पारनेर तालुका पुन्हा टॉपवर आला असून संगमनेर दुसर्‍या स्थानावर आला आहे. मात्र दोन्ही तालुक्याची आकडेवारी शंभरच्या पुढे आहे. तर पाथर्डी तालुका तिसर्‍या स्थानावर आला आहे.

पारनेर, पाथर्डी, राहुरी, जामखेड, कर्जत, श्रीरामपूर येथील आकडेवारीत वाढ झाली असून इतर ठिकाणची आकडेवारीत घट झाली आहे. मिलटरी हॉस्पिटलमध्ये काही दिवसापासून एकही कोरोना बाधित आढळला नव्हता मात्र आज तेथे 3 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 260, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 352 तर अँटीजेन चाचणीत 145 असे 757 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 106, संगमनेर 103, पाथर्डी 74, श्रीगोंदा 73, नगर ग्रामीण 58, राहुरी 51, जामखेड 46, शेवगाव 45, कर्जत 39, अकोले 36, नगर शहर 36, नेवासा 36, श्रीरामपूर 15, इतर जिल्हा 12, राहाता 10, भिंगार 07, कोपरगाव 07, मिलटरी हॉस्पिटल 03 असे कोरोना बाधित आढळून आले.

सध्या निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडतांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply