Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

भोंदूची भोंदुगिरी उघड

दुप्पट पैसे करण्याचे अमिष दाखवत लुटत होते । पोलिसांकडून चार लाख रुपये जप्त

विजय उंडे । वीरभूमी- Aug 17, 2021 • 12:00 AM 2596 views
श्रीगोंदा ः साधूचा वेष परिधान करून पैसे दुप्पट करून देण्याच्या बहाण्याने करमाळा (जि. सोलापूर) येथील व्यक्तीला लुटणार्‍या दोन भोंदू साधूंना श्रीगोंदा पोलिसांनी जलदगतीने तपासाची सूत्रे हलवत जेरबंद केले आहे. या भोंदू साधूंकडून 4 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल व रोकड हस्तगत करून त्यांना अटक केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी दत्तात्रय महादेव शेटे रा. शिवाजीनगर, करमाळा (जि.सोलापुर) यांना अनोळखी साधुचे वेशातील दोन व्यक्तींनी विश्वासात घेऊन पैसे दुप्पट-तिप्पट करण्याचे आमिष दाखवले. साधूंवर विश्वास ठेवून शेटे यांनी 4 लाख 50 हजार रुपयांची रोकड हिरडगाव फाटा येथे साधूंजवळ सोपवली. पैसे दुप्पट होण्याच्या समजाने शेटे यांनी मोठी लोखंडी पेटी बरोबर आणली.

पैसे पेटीत ठेवण्याच्या बहाण्याने साधूंनी हातचलाखी करून पैसे लांबवले. शेटे यांनी दोन दिवस वाट पाहिल्यावर पैसे दुप्पट तर झालेच नाहीत वर आत ठेवलेले पैसे गायब झाल्याचे निदर्शनास आल्याने आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेटे यांनी याबाबत श्रीगोंदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गट हे करत असताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना दि.16 रोजी खबर्‍यामार्फत माहिती मिळाली की, थेऊर (ता. हवेली, जि. पुणे) येथील दोन बनावट साधूंनी हे कृत्य केले आहे. निरीक्षक ढिकले यांनी सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी पाठवले.

पथकाने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपी संतोष साहेबराव देवकर (वय 45 वर्षे), अशोक फकीरा चव्हाण (वय 45 वर्षे, दोघेही रा. जाधवस्ती थेऊर, ता. हवेली, जि.पुणे) यांना थेऊर येथुन ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी फसवणुकीचा गुन्हा केल्याची कबुली दिली. फसवणुक केलेल्या रकमेपैकी संतोष देवकर याच्याकडून 1 लाख 70 हजार रुपये व अशोक चव्हाण याच्याकडुन 2 लाख 5 हजार रुपये व गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा 25 हजार रुपये किंमत असलेली मोटारसायकल (एम.एम.12 बी क्यू 5529), दोन मोबाईल असा मिळून 4 लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींविरुध्द यापूर्वीही जुन्नर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर, फौजदार अंकुश ढवळे, पोलिस नाईक गोकुळ इंगवले, मुख्य हवालदार प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर, प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित गट व पोलिस कर्मचारी किरण भापकर करत आहेत.

आरोपी हे साधूच्या वेषात लोकांना औषधी वनस्पती, ऋद्राक्ष विक्री करण्याचा व भिक्षा मागण्याचा बहाणा करुन विश्वास संपादन करत जवळीक साधत विश्वास संपादन झाल्यावर आर्थिक अडचणीतले, कर्जबाजार्‍यांची कौशल्याने माहीती घेऊन पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवत जाळ्यात ओढत. त्यानंतर निर्जन ठिकाणी रात्रीचे वेळी पैसे घेवुन बोलावुन फुलावर पैसे ठेवुन हातावर तांदुळ देत.

त्यानंतर डोळे मिटून प्रदक्षिणा घालण्यास सांगत. त्याचदरम्यान हातचलाखीने नजर चुकवून पैसे काढुन घेवुन, एका पिशवित फुले भरुन पिशवीचे तोंड बंद करुन वाहनाचे डिक्कीत ठेवण्यास सांगत. उद्या सकाळपर्यंत उघडू नका नाहीतर पैसे दुप्पट होणार नाहीत, अशी भिती दाखवत. दुसर्‍या दिवशी पैसे दुप्पटीच्या अमिषाने पिशवी उघडल्यावर फसवणूक झाल्याचे लक्षात येत असे.

यामुळे जनतेला नम्र अवाहन करण्यात येते की, पैशाचा पाऊस पाडणे, रक्कम दुप्पट करणे, स्वस्त सोन्याचे अमिष, दागिने पॉलिश करणे, पोलीस असल्याची बतावणी करुन दागिने काढणे, अशा गुन्ह्यांचे अमिष दाखविणारे लोक निदर्शनास आल्यास तात्काळ पोलीस ठाण्यास कळवावे, असे आवाहन सपोनि. दिलीप तेजनकर यांनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply