Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

अंगणवाडी सेविकांचे मोबाईल वापसी आंदोलन

राजेश गायकवाड । वीरभूमी- Aug 17, 2021 • 12:00 AM 1786 views
संगमनेर ः अंगणवाडी सेविकांना मोबाईल वरून शासनाला लाभार्थींचे वजन, उंची, आहार इत्यादी माहिती पाठवावी लागते. यामुळे पोषण ट्रॅकचे काम करणे अवघड झाले आहे. यामुळे मंगळवारपासून मोबाईल वापसी आंदोलन सुरु केले, असल्याची माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. निशाताई शिवूरकर यांनी दिली.

याबाबत माहिती देतांना म्हटले आहे की, शासनाने अंगणवाडी सेविकांना मोबाईल दिले असले तरी ते 2 जीबी रॅमचे आहेत. त्यांची वॉरंटी संपली आहे. मोबाईल नादुरुस्त झाल्यानंतर दुरुस्तीसाठी तीन ते आठ हजार रुपये खर्च येतो. हा खर्च सेविकांकडून वसूल केला जातो.

अंगणवाडी कर्मचारी कृतीसमितीने वारंवार महाराष्ट्र शासनाकडे या संदर्भात मोबाईल सेट बदलून देण्याची मागणी केली. परंतू निधीचे कारण देत सरकार या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे सेविकांना पोषण ट्रॅकचे काम करणे मुश्किल झाले आहे.

यामुळे राज्यभर अंगणवाडी कर्मचारी यांनी निकृष्ट मोबाईल शासनाला परत देण्याचे आंदोलन मंगळवार पासून सुरु केले आहे. संगमनेर, घारगाव प्रकल्प 1 तसेच घारगाव प्रकल्प 2 आणि 24 ऑगस्ट रोजी अकोले व राजूर प्रकल्पातील मोबाईल परत करण्यात येतील, अशी माहिती अंगणवाडी कर्मचारी सभेच्या जिल्हाध्यक्ष सत्यभामा थिटमे आणि जिल्हा सरचिटणीस भारती धरत यांनी दिली आहे.

सर्व अंगणवाडी कर्मचार्‍यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन पूजा घाटकर, इंदुमती घुले, समिना शेख, क्रांती गायकवाड, रेखा अवसरकर, बेबी हरनामे, सुनंदा कदम, अनुसया वराडे तसेच शांताराम गोसावी आदींनी केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply