Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

पारनेर, संगमनेरने वाढवला बाधितांचा आकडा

आजही पारनेर, संगमनेर शंभरी पार । इतर तालुके 57 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी- Aug 18, 2021 • 12:00 AM 1965 views
गेल्या तीन दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटू लागली होती. मात्र आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात एकुण 769 कोरोना बाधित आढळले. हा वाढलेला आकडा पारनेर व संगमनेरमुळे वाढल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.

आज आढळलेल्या आकडेवारीत पुन्हा पारनेर तालुका पुन्हा टॉपवर आला आहे. त्याखालोखाल संगमनेरचा क्रमांक लागतो. या दोन्ही तालुक्याची आकडेवारी शंभरच्या पुढे असून इतर तालुके 57 च्या आत आहेत.

मागील तीन दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी कासव गतीने घटत चालली होती. मात्र आज पारनेर व संगमनेर तालुक्यातील आकडेवारीने एकुण आकडेवारीत वाढ झाली आहे. यामुळे या दोन्ही तालुक्याची चिंता वाढली आहे.

सध्या निर्बंध शिथिल करण्यात आल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी. घराबाहेर पडतांना कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, नियमित स्वच्छ हात धुवावे, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 208, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 255 तर अँटीजेन चाचणीत 306 असे 769 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 144, संगमनेर 139, नगर ग्रामीण 57, अकोले 54, पाथर्डी 53, शेवगाव 53, श्रीगोंदा 50, जामखेड 31, नेवासा 31, राहाता 29, नगर शहर 28, कर्जत 26, इतर जिल्हा 21, श्रीरामपूर 19, कोपरगाव 18, राहुरी 16 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply