Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

असा आहे पुढील पंधरा दिवसातील पावसाचा अंदाज

हवामान अभ्यासक पंजाब डख यांचा अंदाज

अहमदनगर । वीरभूमी- Aug 21, 2021 • 12:00 AM 4346 views
पुढील दि. 21 ते 23 ऑगस्ट या काळात मराठवाडा व विदर्भात जोरदार पाऊस (Heavy rains in Marathwada and Vidarbha) पडणार आहे.

तसेच राज्यात दि. 29 ते 3 सप्टेंबर 2021 या काळात मुसळधार पाऊस पडणार (It will rain heavily) असून दि. 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान उघडीप मिळणार आहे. यामुळे शेतकर्‍यांनी मूग काढणी सारखी शेतीची कामे या पाच दिवसात करून घ्यावीत.

त्यानंतर 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस (Heavy rains in some parts of the state) पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डंख (Climate Punjab dak) यांनी व्यक्त केला आहे.

मागील अनेक दिवसापासून पावसात खंड पडला होता. मात्र हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी गेल्या चार-पाच दिवसापासून पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता. त्या अंदाजानुसार सध्या पाऊस सुरू आहे.

हा पाऊस दि. 23 ऑगस्ट पर्यंत असणार असून त्यानंतर दि. 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान पाऊस उघडीप देणार आहे. या काळात सूर्यदर्शन होणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी व्यक्त केला आहे.

पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतकर्‍यांनी मूग काढणीसारखी कामे तातडीने करून घ्यावीत. कारण त्यानंतर पुन्हा सहा दिवस मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

हवामान अभ्यासक पंजाब डंख यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार दि. 21 ते 23 ऑगस्ट पाऊस सुरू राहील. त्यानंतर दि. 24 ते 28 ऑगस्ट हवामान कोरडे राहणार आहे. या काळात शेतकर्‍यांनी आपली कामे उरकून घ्यावीत.

त्यानंतर दि. 29 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या काळात राज्यातील नांदेड, परभणी, लातूर, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, अहमदनगर, बीड, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, जळगाव, धुळे, औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे.

तसेच राज्यातील इतर भागातही जोरदार व तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply