Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आज आढळलेल्या बाधितांमध्ये किंचितशी घट

संगमनेर पुन्हा शंभरी पार; पारनेर दुसर्‍या तर अकोले तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Aug 21, 2021 • 12:00 AM 1459 views
आजही अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील एकुण कोरोना (corona) बाधितांच्या आकडेवारीत किंचितशी घट झाली आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 634 कोरोना बाधित आढळले. एकुण आकडेवारी कमी झाली असली तरी संगमनेर (sangamner), पारनेर (parner), अकोले (akole), पाथर्डी (pathardi) या तालुक्यांची आकडेवारी वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर टॉपवर असून अजही संगमनेरने शंभरचा आकडा पार केला आहे. आज पुन्हा पारनेर तालुका दुसर्‍या स्थानावर तर अकोले तिसर्‍या स्थानावर आले आहेत. काही तालुक्याची एकुण आकडेवारी वाढली आहे तर काही तालुक्यांची आकडेवारी घटली आहे.

राज्यातील कोरोना संसर्ग घटल्याने निर्बंधात शिथीलता आणली आहे. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी जास्त असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. निर्बंध शिथिल केले असले तरी नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणुन शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 121, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 232 तर अँटीजेन चाचणीत 281 असे 634 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 120, पारनेर 97, अकोले 57, पाथर्डी 53, श्रीगोंदा 41, नगर ग्रामीण 38, कर्जत 35, नेवासा 31, शेवगाव 31, जामखेड 30, राहाता 22, राहुरी 22, नगर शहर 20, इतर जिल्हा 20, कोपरगाव 09, भिंगार 5, श्रीरामपूर 3 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply