Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

दारुच्या नशेत पत्नीचा खून; पश्चाताप म्हणुन पतीचीही आत्महत्या

शेवगाव तालुक्यात खळबळ । मयत पतीवर खुनाचा गुन्हा दाखल

शेवगाव । वीरभूमी- Aug 20, 2021 • 12:00 AM 5777 views
दारुच्या नशेत (Intoxicated) केलेल्या मारहाणीत पत्नीचा खून (Wife's murder) झाल्याचे लक्षात आल्यानंतर पतीने पश्चाताप म्हणुन लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या (Suicide by strangulation) केल्याची घटना शेवगाव (shevgaon) तालुक्यातील खरडगाव (khardgaon) येथे आज शुक्रवारी उघडकीस आली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेतील मयताची नावे पत्नी लताबाई दशरथ दळे (वय 45) व पती दशरथ मन्सीराम दळे (वय 50) अशी आहेत.

याबाबत मयताच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून पत्नीचा खून केल्याने मयत दशरथ दळे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी दशरथ दळे याने पश्चाताप म्हणुन आत्महत्या (Suicide as repentance) केल्या आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत मयताचा मुलगा नवनाथ दशरथ दळे (वय 23) या दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी शेवगाव तालुक्यातील खरडगाव येथे कुटूंबासह राहतो व मजुरीकाम करुन माझ्या कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो. माझी आई लताबाई (वय 45 वर्षे) व वडील-दशरथ मन्सीराम दळे (वय 50 वर्षे) हे आमच्या घरासमोरच झोपडीत राहतात. माझा लहान भाऊ संदीप दशरथ दळे याचे लग्न झालेले असल्याने तो त्याचे कुटंबासह माझ्याच घरात दुसर्‍या खोलीत राहतो. माझी लहान बहिण रोहिणी हिला चिखलठाण येथे दिलेली असल्याने ती सासरी राहत असते. माझे वडील दशरथ हे नेहमी दारु पित असतात व त्यामुळे ते बर्‍याच वेळा दारुचे नशेत आई सोबत व आमचे सोबत भांडण करुन शिवीगाळ करीत असत.

दि. 19 ऑगस्ट 2021 रोजी संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे जेवण करुन घरात असताना रात्रीचे अंदाजे 11.00 वाजे दरम्यान आई-वडीलांचे झोपडीत आपसात भांडण सुरु होते. त्यावेळी बाहेर पाऊस सुरु असल्याने व त्यांचे नेहमीचेच भांडण असल्याने आम्ही त्यांचेकडे दुर्लक्ष केले व झोपी गेलो.

दुसर्‍या दिवशी दि.20 ऑगस्ट वोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास मी झोपेतुन उठलो. त्यावेळी माझा लहान भाऊ संदीप याने मला फोन करुन सांगितले की, तात्याने आपले घरापासून जवळच असलेल्या एका झाडाला दोराने गळफास घेतलेला आहे. त्यावेळी मी तेथे जाऊन खात्री केली असता माझे वडील दशरथ मन्सीराम दळे (वय 50 वर्षे) हे झाडाला दोरीचे सहाय्याने गळफास घेऊन लटकलेले दिसले. त्यावेळी मी व भाऊ असे आम्ही घरी आईला उठवायला झोपडीत गेलो असता आई काहीएक हालचाल करत नव्हती. तिचे डोक्याला मार लागुन डोक्यातुन व नाकातुन रक्त येत होते. तेथे बाजुलाच लाकडी दांडा पडलेला होता. त्याला एका बाजुने रक्त लागलेले होते.

सदर घटनेबद्दल गावातील लोकांना माहिती झाल्यावर काही वेळाने पोलीस आल्यावर गावातील लोकांचे मदतीने आम्ही आई-वडीलांना अ‍ॅम्ब्युलन्समध्ये टाकुन शेवगाव ग्रामीण रुग्णालय येथे आणले.

या घटनेवरून आमची खात्री झाली की, माझ्या वडीलांनीच रात्रीचे वेळी दारुच्या नशेत आईला दांडक्याने डोक्यात मारहाण करुन जिवे ठार केले. त्यानंतर पश्चातापात होऊन वडील दशरथ मन्सीराम दळे यांनी स्वतः आमचे घराचे जवळच असणारे झाडाला दोराने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे.

याप्रकरावरून वडीलांनी दारुच्या नशेत आईच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारहाण करून खून केला आहे. या फिर्यादीवरून शेवगाव पोलिस ठाण्यात मयत दशरथ मन्सीराम दळे यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर आपल्याकडून दारुच्या नशेत पत्नीचा खून झाल्याचे समजल्यावर दशरथ दळे याने घराजवळच असणार्‍या लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात गुन्हा दाखल केला आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply