Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

संगमनेर, अकोलेची चिंता कायम

शेवगाव, पाथर्डी, श्रीरामपूर, कोपरगावच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Aug 25, 2021 • 12:00 AM 2232 views
आज बुधवारी अहमदनगर (ahmedngar) जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत थोडीशी वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात 712 कोरोना (corona) बाधित आढळले होते तर आज बुधवारी जिल्ह्यात 734 कोरोना बाधित आढळले आहे. कासवगतीने वाढणार्‍या आकडेवारीने चिंता वाढत आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर (sangamner), अकोले (akole) शंभरी पार आहे. यामध्ये संगमनेरची आकडेवारी घटली असून अकोलेची आकडेवारी 1 ने वाढली आहे. त्या खालोखाल श्रीगोंदा, पारनेर, शेवगावचा क्रमांक लागतो. काल मंगळवारी पाथर्डी कोपरगाव, श्रीरामपूर, शेवगाव या तालुक्यांची एक अंकी असलेली आकडेवारी पुन्हा दोन अंकावर गेली आहे.

गेल्या दोन-तीन दिवसापासून एकुण बाधितांच्या आकडेवारीत वाढ होत आहे. वाढता आकडा रोखण्यासाठी नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्क वापरावा. नियमित हात स्वच्छ धुवावे तसेच कोरोना नियमाचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आज बुधवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 101, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 285 तर अँटीजेन चाचणीत 348 असे 734 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 147, अकोले 103, श्रीगोंदा 87, पारनेर 64, शेवगाव 47, कर्जत 44, नगर ग्रामीण 38, राहुरी 38, राहाता 34, नेवासा 31, पाथर्डी 27, नगर शहर 22, कोपरगाव 18, श्रीरामपूर 18, जामखेड 12, इतर जिल्हा 04 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply