Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अवैध मावा विक्री करणार्‍या बोधेगावातील चार पान टपर्‍यावर छापा

शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेची दुसरी कारवाई

शेवगाव । वीरभूमी - Aug 25, 2021 • 12:00 AM 4609 views
सुगंधी तंबाखू व मावा विक्री (Selling fragrant tobacco and powder) प्रकरणी शेवगाव (shevgaon) तालुक्यातील बोधेगाव (bodhegaon) येथील चार पान टपर्‍यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (local crime branch) पथकाने छापा टाकून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या घटनेने बोधेगावसह शेवगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शेवगाव तालुक्यातील अवैध व्यवसायांना आळा घालण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला छापा टाकावा लागत असल्याने शेवगाव पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न चिन्ह उभे राहीले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मागी आठवड्यापासून छापा सत्र सुरू केले आहे. दोन दिवसापुर्वी शेवगाव शहरातील लॉजवर सुरू असलेल्या कुंटणखाण्यावर छापा टाकल्यानंतर आज बुधवारी तालुक्यातील बोधेगाव येथील पान टपर्‍यांवर छापा टाकून चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या पान टपर्‍यामध्ये अवैधपणे सुगंधी तंबाखू मिश्रीत मावा विक्री करण्यात येत होती.

याबाबत समजलेली हकीगत अशी की, स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. अनिल कटके यांचे आदेशाने पोना. सचिन आडबल, पोकॉ. प्रकाश गणपत वाघ, पोकॉ. जालिंदर मुरलीधर माने, पोकॉ. विनोद शिवाजी मासाळकर हे खाजगी वाहनाने शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बोधेगाव येथे आले असता राजेंद्र पंढरीनाथ शिंदे हा बोधेगाव बसस्टॅण्ड जवळ गौरव पान स्टॉल, लतीफ बाबा शेख हा मारुती मंदिरा समोर पाकिजा पान सेंटर, रम्मू बाबा शेख हा न्यू पाकिजा पान सेंटर व जमीर रशिद शेख हा बाजारतळासमोर असलेल्या सहारा पान स्टॉलमध्ये राज्यात तंबाखूजन्य पदार्थ तसेच सुगंधी तंबाखू मिश्रीत तयार मावा विक्री करण्यास प्रतिबंध असतांना अवैधपणे विक्री करतांना आढळून आले.

या वरील चार पान स्टॉलवर स्थानिक गुन्हे शाखेने पंचासमक्ष छाोा टाकून 16 हजार 900 रुपये किंमतीचा सुपारीचा चुरा व तयार मावा आणि रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त करून राजेंद्र पंढरीनाथ शिंदे (रा. घोरतळे गल्ली, बोधेगाव), लतीफ बाबा शेख (रा. भराट गल्ली, बोधेगाव), रम्मु बाबा शेख (रा. भराट गल्ली, बोधेगाव) व जमिर रशिद शेख (रा. घुले मंगल कार्यालयासमोर, बोधेगाव) यांच्यावर भादंवि कलम 188, 272, 273 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेवगाव तालुक्यात अवैध धंदे बोकाळले असून गुन्हेगारी वाढली आहे. यामुळे हत्या व आत्महत्या, चोरीच्या घटनामध्ये वाढ झाली आहे. शेवगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अवैध धंद्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक छापा टाकून कारवाई करत आहे. मात्र हे अवैध धंदे शेवगाव पोलिसांना कळत नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply