Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

वाढता वाढे कोरोना बाधितांचा आकडा

श्रीगोंदा टॉपवर; संगमनेर, पारनेरही शंभरच्या पुढे

अहमदनगर । वीरभूमी- Aug 28, 2021 • 12:00 AM 2231 views
अहमदनगर जिल्ह्यातीेल कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज शनिवारी लक्षणीय वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात एकुण 852 कोरोना बाधित आढळले. वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये श्रीगोंदा तालुका टॉपवर आला असून दुसर्‍या स्थानावर संगमनेर व तृतीय स्थानावर पारनेर तालुके राहीले आहे. या तीनही तालुक्यांची आकडेवारी शंभरच्या पुढे आहे, यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालली होती. मात्र आज शनिवारी एकुण बाधितांचा आकडा वाढला आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे. नियमित मास्क वापरावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे, नियमित स्वच्छ हात धुवावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 361, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 233 तर अँटीजेन चाचणीत 258 असे 852 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीगोंदा 162, संगमनेर 160, पारनेर 109, अकोले 61, राहाता 52, पाथर्डी 50, नेवासा 43, कर्जत 38, नगर ग्रामीण 35, शेवगाव 30, नगर शहर 20, जामखेड 19, कोपरगाव 15, इतर जिल्हा 13, श्रीरामपूर 10 असे कोरोना बाधित आढळून आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply