Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

भंडारदरा धरण ओव्हरफ्लो

मुळा धरण पाणलोटातही पावसाची संततधार

अकोले । वीरभूमी- Sep 12, 2021 • 12:00 AM 3959 views
संपुर्ण नगर जिल्हयाचे लक्ष लागून असलेले व उत्तर नगर जिल्ह्याची जीवनदायिनी समजले जाणारे भंडारदरा धरण सालाबाद प्रमाणे 15 ऑगस्टच्या आत भरण्याऐवजी यावर्षी आपले रेकॉर्ड मोडीत तब्बल जवळपास महिना भराने 11039 दलघफू म्हणजे पूर्ण क्षमतेने भरले आहे.

गेल्या महिनाभरात पावसाने उघडीप दिली होती. मात्र बुधवार पासून भंडारदरा,घाटघर, रतनवाडी, पांजरे, वाकी येथे पावसाचा जोर वाढल्याने भंडारदरा धरण भरले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

या धरणावर आधारीत निळवंडे धरणही 85 टक्के भरले आहे. त्यामध्ये भंडारदरा धरणातून पाण्याची आवक सुरू झाली असून ते येत्या दोन दिवसात तेही भरणार आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे मोठी पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे निळवंडे धरणात पाण्याची आवक वाढली आहे.

धरण भरल्यामुळे पाण्याची पातळी नियंत्रीत करण्यासाठी स्पिलवे मधून पाणी सोडण्यात आले. मुळा पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार चालू असल्याने मुळा नदी दुथडी भरून वाहत आहे.

तसेच आठवडाभरापासून सुरु असलेल्या पावसाने आदिवासी भागातील शेतीकामांना पुन्हा वेग आला आहे. रखडलेली आवणीच्या कामांत शेतकरी गुंतून गेला आहे. तसेच या सततच्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मात्र कोरोनामुळे पर्यटकांवर मोठा परिणाम झाल्याचे बोलले जात आहे. तालुक्यात सर्वच भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आढळा धरण 55 टक्के भरले आहे.

भंडारदरा धरणाच्या सांडव्यातून 2436 क्युसेस व विद्यूतगृहाद्वारे 820 क्युसेस असा एकुण 3256 क्युसेस विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये आवश्यकतेनुसार वाढ होऊ शकते. त्यामुळे प्रवरा नदीकाठच्या रहीवाशांनी आपली तसेच आपल्या पशुधनाची व शेती अवजारांची काळजी घ्यावी, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply