Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

भंडारदरा नंतर हे धरणही ओव्हरफ्लो

भंडारदरा नंतर हे धरणही ओव्हरफ्लो

अकोले । वीरभूमी- Sep 13, 2021 • 12:00 AM 2794 views
भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाल्यानंतर धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली आणि दुसर्‍याच दिवशी सोमवारी दुपारी निळवंडे धरणही भरले. या धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी सोमवारी दुपारी सुमारे दोनच्या सुमारास या धरणातून एकूण 8 हजार 144 क्युसेसने पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आले. त्यात वाढ करत सायंकाळी 7 वाजता 10 हजार 856 क्युसेस ने पाणी सोडण्यात येत आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुमारे महिनाभराच्या दीर्घ विश्रांती नंतर मागील सहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. रविवारी भंडारदरा धरण भरले आणि या धरणातून आज सोमवारी सायंकाळी 9 हजार 892 क्युसेसने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

या पाण्याबरोबरच निळवंडे पाणलोट क्षेत्रातही जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. हे सर्व पाणी निळवंडे जलाशयात अडविले जात आहे. त्यामुळे पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत गेली.

सोमवारी दुपारी दोनच्या सुमारास या धरणातील पाणीसाठा 94 टक्के म्हणजेच 7 हजार 731 दशलक्ष घनफुटा पर्यंत पोहचला आणि धरण तांत्रिकदृष्टया भरल्याने या धरणाच्या वक्र दरवाजांतून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. यावेळी या धरणातील विसर्ग 10 हजार 856 क्यूसेस इतका होता.

मात्र भंडारदरा धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेत धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरण विभागाने तीन तासांनंतर या विसर्गात वाढ करत सायंकाळी सात वाजता तो 9 हजार 892 क्यूसेस इतका केला. त्यामुळे प्रवरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे.

दरम्यान भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मागील सहा दिवसांपासून पावसाचे प्रमाण वाढते आहे. भंडारदरा पाठोपाठ निळवंडे धरण भरल्याने अकोले तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असून निळवंडे धरणातून प्रवरा नदी पात्रात सोडलेले पाणी जायकवाडी धरणाकडे झेप घेत आहे.

भंडारदरा व निळवंडे करणातून प्रवरा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दोन्ही धरणे भरल्याने शेतकरी वर्गात व नागरिकांत आनंदाचे वातावरण झाले आहे. पावसाचा जोर असाच राहीला तर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा लागण्याची शक्यता निर्माण होईल, असे मत व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply