Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली

तहसीलदार ज्योती देवरे यांची अखेर बदली

पारनेर । लतिफ राजे- Sep 13, 2021 • 12:00 AM 4040 views
पारनेरच्या वादग्रस्त तहसीदार ज्योती देवरे यांची अखेर आज बदली झाली आहे. देवरे यांची बदली तहसीलदार (संगायो) अ, वर्ग न. पा. क्षेत्र जळगाव या तहसीलदार नामदेव पाटील यांच्या प्रस्तावित रिक्त होणार्‍या जागेवर झाली आहे.

तहसीलदार ज्योती देवरे यांच्या बदलीचे आदेश आज दि. 13 रोजी राज्य शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांच्या सहीने निघाले आहेत. यामुळे आ. निलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातील वाद संपुष्टात येणार आहेत.

पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या विरोधात अनेकांनी नाशिक विभागीय आयुक्त यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची चौकशी करून विभागिय आयुक्त कार्यालयाला अहवाल सादर केला होता.

या अहवालानुदार तहसीलदार ज्योती देवरे यांनी पदावर कार्यरत असतांना शासकीय कामकाजात कर्तव्य पारायणता ठेवलेली नसून शासकीय कर्तव्यव जबाबदार्‍या तत्परतेने पार पाडलेल्या नाहीत. तसेच नाशिक विभागीय आयुक्त यांनी शासनाला पाठविलेल्या अहवालानुसार तातडीची निकड विचारात घेता तहसीलदार ज्योती देवरे यांची तहसीलदार (संगायो) अ, वर्ग न. पा. क्षेत्र जळगाव या तहसीलदार नामदेव पाटील यांच्या प्रस्तावित रिक्त होणार्‍या जागेवर बदली करण्यात आली आहे.

या बदलीमुळे आ. निलेश लंके व तहसीलदार ज्योती देवरे यांच्यातील वाद संपुष्टात येणार आहे. आता पारनेरला तहसीलदार म्हणुन कोणाची वर्णी लागते, याकडे पारनेर तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply