Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

अखेर आजी-माजी सरपंचासह ग्रामविकास अधिकार्‍यावर गुन्हे दाखल

14 व्या वित्त आयोगाच्या कामात अनियमीतता । अपहार केल्याचे चौकशीत स्पष्ट

श्रीगोंदा । वीरभूमी- Sep 20, 2021 • 12:00 AM 7661 views
श्रीगोंदा तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाचे गाव असलेल्या लोणी व्यंकनाथ येथील ग्रामपंचायतीत सन 2018 ते 20 या कालावधीत 14 व्या वित्त आयोगातील शासकीय निधीचा गैरवापर करत विकास कामात अनियमितता, प्रशासकीय अनियमितता व मोठ्या प्रमाणात आर्थिक अपहार प्रकरणी गावातील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकडे, एस. पी. जगताप, दादा मडके, स्वप्निल लाटे यांनी केलेल्या तक्रार अर्जावरून झालेल्या चौकशी अहवालात दोषी आढळले होते.

यामुळे राज्य बाजार समितीचे संचालक बाळासाहेब नाहाटा समर्थक तत्कालीन सरपंच संतोष चंद्रकांत माने, विद्यमान सरपंच रामदास बबन ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशिनाथ खामकर यांच्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी सारिका रोहिदास हराळ यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी राजकीय दबावामुळे गुन्हा दाखल होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष राजेंद्र काकडे यांनी सोमवार दि. 20 रोजी तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू केले. काकडे यांच्या उपोषण आंदोलनाला अखेर प्रशासन नमल्याने अपहार प्रकरणी आजी-माजी सरपंच व तत्कालीन ग्रामविकास अधिकार्‍यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सन 2018 ते 19 दरम्यान तत्कालीन सरपंच संतोष चंद्रकांत माने व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ काशिनाथ खामकर यांनी संगनमताने 14 व्या वित्त आयोगातील निधी व वित्त आयोगाच्या आराखड्यात समाविष्ट नसलेली काही कामे इन्व्हर्टर खरेदी, कार्यालय पीओपी, स्मशानभूमी मुरुमीकरण, कार्यालय विस्तार, पेव्हर ब्लॉक, एलईडी दिवे, फर्निचर इत्यादी कामात अनियमितता व कागदोपत्री कामे दाखवून 25 लाख 56 हजार 252 रुपयांचा अपहार व फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला.

त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी रामभाऊ खामकर यांच्या जानेवारी 2020 ते आजअखेर कालावधीत पवारवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत व शेंडेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची संरक्षक भिंत या कामात प्रत्यक्ष काम न करता 1 लाख 32 हजारांची बिले काढून शासनाची फसवणूक केल्याचे सहाय्यक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, जिल्हा परिषदेचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता, लेखा परीक्षा अधिकारी, स्थानिक लेखा परीक्षा कार्यालय यांच्या संयुक्त चौकशीत एकूण 26 लाख 88 हजार 352 रुपयांचा अपहार व शासनाची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

गटविकास अधिकारी यांच्या आदेशानुसार विस्तार अधिकारी सारिका रोहिदास हराळ यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात माजी सरपंच संतोष माने, विद्यमान सरपंच रामदास ठोंबरे व तत्कालीन ग्रामविकास अधिकारी व सध्या सेवा निवृत्त असलेले रामभाऊ खामकर यांच्यावर शासनाची फसवणूक व आर्थिक अपहार प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल होण्याआधी पोलिस निरीक्षक रामराव ढिकले व पोलिस उपनिरीक्षक अमिल भारती यांनी ग्रामपंचायत लोणी व्यंकनाथ येथे भेट देऊन पाहणी केली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अमितकुमार माळी हे करत आहेत.

गेल्या चार वर्षांपासून ग्रामपंचायत कार्यालयात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालू आहे. आत्ता फक्त 26 लाखांचा घोटाळा उघडकीस आला आहे. अजून लाखो रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी सुरु आहे. ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपद नाममात्र आहे. याचा कर्ताकरविता दुसराच असून लवकरच त्याच्यावरही गुन्हे दाखल होणार आहेत. जनतेचे व शासनाचे पैसे खाणारे लवकरच गजाआड होणार असल्याचे उपोषणकर्ते लोणीव्यंकनाथ येथील सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र काकडे यांनी सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply