Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

जिल्ह्यातील या पालिकेचे दोन नगरसेवक भाजपाकडून निलंबित

जिल्ह्यातील या पालिकेचे दोन नगरसेवक भाजपाकडून निलंबित

नेवासा । वीरभूमी- Sep 26, 2021 • 12:00 AM 1821 views
नेवासा नगरपंचायतीमधील (newasa municipality) भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर निवडून आलेले (Elected on the lotus symbol of the Bharatiya Janata Party) रणजीत दत्तात्रय सोनवणे व दिनेश प्रताप व्यवहारे (Ranjit Dattatraya Sonawane and Dinesh Pratap vyavhare) या दोन नगरसेवकांना पक्षविरोधी काम केल्याने भारतीय जनता पार्टीतून निलंबित (Suspended from Bharatiya Janata Party for anti-party activities) करण्यात आले असल्याची घोषणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर (District President Rajendra Gondkar) यांनी केली.

नेवासा नगरपंचायतीची दुसरी निवडणूक एप्रिल 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहर व तालुका भाजप अग्रेसर झालेले दिसून येत आहे. भाजपच्या तीन बैठका झाल्या असून त्यात प्रभाग निहाय अभ्यास व संपर्क सुरू करण्यात आलेला आहे.

नेवासा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांनी त्यांची निवड झाल्यावर शहराध्यक्षांसह शहर चिटणीसांचे पक्षाातून निलंबन केले होते. आता नगरपंचायतीच्या पार्श्वभूमीवर दोन नगरसेवकांचे निलंबन करण्यात आले आहे. प्रभाग क्रमांक 15 मधून एकतर्फी निवडून आलेले दिनेश व्यवहारे व प्रभाग क्रमांक 9 मधून केवळ एक मताने निवडून आलेले रणजीत सोनवणे अशी निलंबित नगगरसेवकांची नावे आहेत.

या निलंबन कारवाईच्या पत्रकात म्हटले आहे की, या दोन्ही उमेदवारांच्या 2017 सालच्या विजयामध्ये पक्षाचा मोठा वाटा होता. त्यानंतर वेळोवेळी पक्ष्याच्या पदाधिकार्‍यांकडून निरोप येऊनही पक्ष कार्यक्रमात उपस्थित न राहता विरोधकांच्या कार्यक्रमात हे दोघेही उपस्थित राहत होते.

त्यांचे पक्षविरोधी काम सुरू असल्याने दखल घेऊन पक्षाने या दोन नगरसेवकांना सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले असल्याचे पत्रकात म्हटले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply