Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

आकडा घटला मात्र चिंता कायम

संगमनेर टॉपवरच । श्रीगोंदा दुसर्‍या तर पारनेर तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Sep 27, 2021 • 12:00 AM 1533 views
अहमदनगर जिल्ह्यात आज सोमवारी एकुण 630 कोरोना बाधित आढळले. आज आढळलेली बाधितांची आकडेवारी रविवारच्या तुलनेत घटली आहे. आकडेवारी घटली असली तरी एकुण बाधितांचा आकडा मोठा असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर तालुका टॉपवर आहे. मात्र रविवारच्या तुलनेत आकडेवारीत घट झाली आहे. त्याचप्रमाणे दुसर्‍या स्थानी श्रीगोंदा तर तिसर्‍या स्थानी पारनेर तालुका आहे. मात्र येथेही रविवारच्या तुलनेत आकडेवारीत घट झाली आहे.

तसेच आज आढळलेल्या बाधितांमध्ये श्रीरामपूर, नगर ग्रामीण, अकोले, कोपरगाव, पाथर्डी, राहुरी या तलुक्यांची आकडेवारीत वाढ झाली आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर टॉपवरच असून 152 कोरोना बाधित आढळले आहेत. दुसर्‍या स्थानावर पारनेर 95 तालुका असून तिसर्‍या स्थानी श्रीगोंदा 80 तालुका आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा घटत नसल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 176, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 313 तर अँटीजेन चाचणीत 141 असे 630 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 108, श्रीगोंदा 70, पारनेर 67, श्रीरामपूर 43, नगर ग्रामीण 42, अकोले 37, कोपरगाव 36, नेवासा 35, पाथर्डी 29, राहुरी 28, शेवगाव 25, कर्जत 24, नगर शहर 23, जामखेड 22, राहाता 22, इतर जिल्हा 17, भिंगार 01, मिलटरी हॉस्पिटल 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply