Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी रास्तारोकोचा इशारा

नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी रास्तारोकोचा इशारा

बोधेगाव । वीरभूमी- Sep 27, 2021 • 12:00 AM 1670 views
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी, बोधेगावसह परिसरातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, या मागणीसाठी शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे यांनी शेवगावचे तहसीलदार यांना लेखी निवेदन दिले आहे.

कार्यवाही न झाल्यास बालमटाकळी व परिसरातील असंख्य शेतकर्‍यासह मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी बालमटाकळी येथे शेवगाव-गेवराई राज्य मार्गावर सकाळी 8 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा राजपुरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

शेवगावचे तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील बालमटाकळी व परिसरात यावर्षी सरासरी पेक्षा जास्त पाऊस होऊन अतिवृष्टीमुळे सर्वच शेतकर्‍यांचे कापूस, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, बाजरी यासह आदी खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे पिके सडून गेली आहेत.

तसेच बालमटाकळी ते कांबी रस्त्यावर गावाजवळ असलेला पूल वाहून गेला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना शेतामध्ये जाण्या-येण्याचा रस्ता बंद झालेला आहे. तसेच गावामध्ये अनेक ठिकाणी घरांची पडझड झालेली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या बांधकाम केलेल्या विहिरी ढासळून बुजल्या आहेत. तरी झालेल्या सर्व नुकसानीचे सरसकट पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई मिळावी.

अन्यथा बालमटाकळीसह परिसरातील असंख्य शेतकर्‍यासह तसेच विविध पक्षाच्या पदाधिकार्‍यासह मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी बालमटाकळी येथे शेवगाव-गेवराई या राज्य महामार्गावर सकाळी 8 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल. असे तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनात नमूद केले आहे.

सदरील निवेदनावर कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, बालमटाकळी गावच्या सरपंच सौ. कौशल्या कवडे, उपसरपंच तुषारभाऊ वैद्य, अशोक खिळे, धनंजय देशमुख, विक्रम बारवकर, संदीप देशमुख, हरीचंद्र घाडगे, वसंतराव घाडगे, राम तांबे, शेखर बामदळे, अंकुश मसुरे, राम बामदळे, अनिल परदेशी यांच्या सह आदी शेतकर्‍यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

या निवेदनाच्या प्रती पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ, खासदार सुजय विखे, शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे, तालुका कृषी अधिकारी शेवगाव, पोलीस निरीक्षक शेवगाव यांना दिल्या आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply