Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

रोहित्राच्या मागणीसाठी जिरेवाडी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

रोहित्राच्या मागणीसाठी जिरेवाडी ग्रामस्थांचे ठिय्या आंदोलन

पाथर्डी । वीरभूमी- Sep 27, 2021 • 12:00 AM 1545 views
एकीकडे राज्य उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे हे विना विलंब रोहित्र बदलून देण्याबाबत महावितरणच्या अधिकार्‍यांना सुचना देतात. मात्र त्यांच्या सुचना महावितरणचे अधिकारी गांभीर्याने घेत नसल्याचे समोर आले आहे.

सुमारे महिनाभरापासून पाथर्डी तालुक्यातील जिरेवाडी येथील खराब झालेले वीज रोहित्र बदलून मिळण्यासाठी ग्रामस्थांना सहाय्यक अभियंता यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन करावे लागले.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील जीरेवाडी गावातील मोठा भाग वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे अनेक महीन्यापासून वीजेविना अंधारात आहे. वीज रोहीत्र मिळावे, या प्रमुख मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे यांच्या नेतृत्वाखाली सहायक अभियंता कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले.

यावेळी जिरेवाडीचे सरपंच उमाजी पवार, उपसरपंच राजेंद्र आंधळे, राजेंद्र बडे, नवनाथ आंधळे, प्रहार अपंग आघाडीचे शिवाजी बडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना आधंळे यांनी सांगितले की, गेल्या सहा महिन्यापासून लाईट बिल भरून घेऊनही अद्याप खराब झालेले रोहीत्र दिले नाही. अनेक दिवसांपासून शेतकरी आक्रमक आहेत. सहाय्यक अभियंता मुंढे यांना प्रहार पक्षाच्या वतीने निवेदन दिले. रोहीत्राची मागणी केली होती. परंतु त्याची दखल न घेतल्यामुळे प्रहारच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकर्‍यांच्या घोषणाबाजीने कार्यालय परीसर दणाणून गेला.

यावेळी सहायक अभियंता मुंढे यांनी वरिष्ठांना कल्पना देत, अति.कार्यकारी अभियंता यांच्याशी फोनवर चर्चा केली. लवकरात लवकर शेती पंप रोहित्र देऊ या आश्वासनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकुंद आंधळे, नवनाथ आंधळे, प्रहार अपंग आघाडीचे शिवाजी बडे, बाळू आंधळे, पांडू आंधळे, सुनिल आंधळे, जयदीप घोरपडे, विलास बडे व जिरेवाडी येथील शेतकरी उपस्थित होते.

राज्यऊर्जा मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या जिल्ह्यातच रोहित्रसाठी शेतकर्‍यांना आंदोलन करण्याची वेळ येत असल्याने ही दुदैवाची बाब आहे. यामुळे ग्रामस्थ व शेतकर्‍यांमधून नाराजीचा सूर निघत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply