Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

समाधानकार ः जिल्ह्यातील आकडेवारी घटली

संगमनेर टॉपवरच । अकोले, राहाता, शेवगावच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Sep 28, 2021 • 12:00 AM 1431 views
अहमदनगर जिल्ह्यात मंगळवारी एकुण 494 कोरोना बाधित आढळले आहेत. दोन दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील एकुण आकडेवारीत घट होत आहे. घटत्या आकड्यामुळे समाधान व्यक्त होत आहे.

अहमदनगर जिल्ह्यात आज आढळलेल्या बाधितांमध्ये संगमनेर तालुका टॉपवरच आहे. मात्र सोमवारच्या तुलनेत एकुण आकडेवारीसह तालुकानिहाय आकडेवारीत घट झाली आहे. मात्र अकोले, राहाता व शेवगाव तालुक्याच्या आकडेवारीत सोमवारच्या तुलनेत वाढ झाली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये राहुरी, जामखेड तालुके एक अंकी असून भिंगार, मिलटरी हॉस्पिटलची आकडेवारी शुन्यावर आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालल्याने समाधान व्यक्त होत आहे. अशीच परिस्थिती राहीली तर लवकरच संपूर्ण अहमदनगर जिल्हा कोरोनामुक्त होईल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

आज मंगळवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 67, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 229 तर अँटीजेन चाचणीत 198 असे 494 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 102, अकोले 53, पारनेर 52, राहाता 51, नगर ग्रामीण 39, नेवासा 30, शेवगाव 28, श्रीगोंदा 25, नगर शहर 24, कर्जत 23, पाथर्डी 18, कोपरगाव 15, श्रीरामपूर 13, इतर जिल्हा 11, राहुरी 07, जामखेड 03 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना संगर्स रोखण्यासाठी नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. नियमित स्वच्छ हात धुवावे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply