Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

पाथर्डी तहसील कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गांधीगीरी

पाथर्डी तहसील कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी गांधीगीरी

पाथर्डी । वीरभूमी- Sep 28, 2021 • 12:00 AM 1983 views
पाथर्डी तहसील कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यावर व परीसरात पाणी साचत आहे. रस्त्यावरील चिखल, दलदल, अस्वच्छता यामुळे नेहमी वर्दळ असलेला भाग व रस्ता खड्डेमय झाला आहे. हा रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी पाथर्डी तालुका शिवसंग्राम पक्षाच्यावतीने खड्ड्याला हार घालून गांधीगिरी करत आंदोलन करण्यात आले.

यावेळी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष परमेश्वर टकले, प्रकाश कचरे, भारत भोईटे, मनसेचे शैलेश शिंदे, बाळासाहेब केदार, आविनाश हाडके, किशोर लांडगे आदी उपस्थित होते.

पाथर्डी तहसील कार्यालयाचा कारभार प्रशस्त व नूतन इमारतीमधून सुरू आहे. मात्र तहसील कार्यालयाकडे जाणार्‍या रस्त्यांवर सतत पडणार्‍या पावसामुळे चिखल व खड्डेमय बनला आहे. यामुळे पाथर्डी तहसील कार्यालयाकडे व पोलिस ठाण्याकडे जाणार्‍यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

या रस्त्याच्या बाजुला सेतू कार्यालये, झेरॉक्स दुकाने आहेत. या दुकानांकडे जातांनाही रस्त्यावरील चिखल व खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागतो. तसेच शासकीय कामांसाठी आलेल्या प्रत्येकाला याचा त्रास होतो.

तालुका प्रशासनाच्या इमारतीकडे जाणार्‍या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी करत शिवसंग्राम पक्षाच्यावतीने रस्त्यावरील खड्ड्यांना फुले वाहून हार अर्पण करत गांधीगीरी करत आंदोलन केले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply