Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

भरधाव पिकअपने दुचाकीवरील तिघांना चिरडले

भरधाव पिकअपने दुचाकीवरील तिघांना चिरडले

पारनेर । वीरभूमी - Sep 30, 2021 • 12:00 AM 2023 views
भरधाव जाणार्‍या पिकअपने दुचाकीला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील तिघांचा जागूच मृत्यू झाला. हा अपघात पारनेर तालुक्यातील ढोकी शिवारात झाला. भरधाव पिकअप नगरहुन टाकळी ढोकेश्वरकडे चालली होती.

या अपघातात दुचाकीवरील तिघांना बरेच अंतर फरफटत नेल्याने तिघांचे मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत आढळून आले. आ अपघात गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान घडला.

याबाबत समजलेली माहिती अशी की, अहमदनरहुन टाकळी ढोकेश्वरकडे मालवाहू पिकअप भरधाव वेगाने जात होती. या पिकअपने कल्याण-विशाखापट्टणम् महामार्गावरील टोलनाका ओलांडल्यानंतर पुढे जाणार्‍या होंडा शाईन या दुचाकीला जोराची धडक मारली. धडक इतकी जोरात होती की, दुचाकीवरील तिघेही काही अंतर दुचाकीसह फरफटत जावून तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

दुचाकीसह फरफटल्याने तिघांचेही मृतदेह छिन्नविछन्न अवस्थेत पडले होते. अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एमएच 17, बीसी 0195 असा आहे.

घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांकडून अपघातग्रस्त पिकअपचा शोध घेतला जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply