Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

महावितरण कर्मचार्‍यांच्या अथक परिश्रमातून वीजपुरवठा सुरळीत

कासार पिंपळगाव, भोसे वीजउपकेंद्राचा वीजपुरवठा तब्बल 43 तास होता खंडीत

पाथर्डी । वीरभूमी - Oct 08, 2021 • 12:00 AM 1182 views
वीजेच्या गडगडाटासह मंगळवारी झालेल्या पावसामुळे पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागातील वीजपुरवठा खंडीत झाला होता. खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणच्या तब्बल डझनभर कर्मचार्‍यांनी अथक 32 तास परिश्रम घेत खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. तब्बल 43 तास खंडीत असलेला वीजपुरवठा सुरळीत झाल्याने समाधान व्यक्त होत आहे.

पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागात मंगळवार दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री वीजेच्या गडगडाटासह वादळी पावसाने हजेरी लावली होती. यामुळे पाथर्डी येथून कासार पिंपळगाव, भोसे या वीजउपकेंद्राकडे जाणारा वीजपुरवठा मंगळवारी रात्री 8.10 वाजेच्या दरम्यान खंडीत झाला होता.

ऐन सनासुदीच्या काळात खंडीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची टीम बुधवारी पहाटेपासूनच कामाला लागली. सुरुवातीला किरकोळ वाटणारा वीजपुरवठ्यातील दोष रात्र झाली तरी सापडला नाही. यामुळे बुधवारी रात्री उशिरा पर्यंत सुरु असलेली कारवाई गुरुवारी पहाटेपासून पुन्हा सुरू झाली.

गुरुवारीही पाथर्डी ते कासार पिंपळगाव वीजउपकेंद्रापर्यंत येणार्‍या लाईनचे पोल ना पोल कर्मचार्‍यांकडून तपासण्यात आले. अखेर गुरुवार दि. 7 रोजी दुपारी 2.30 वाजेच्या दरम्यान कराडवस्ती येथे वीजपुरवठ्यामधील दोष आढळून आला. दोष पहाणी काळात तब्बल 24 पोलवरील पिन ईन्सुलेटर बदलण्यात आले.

महावितरणच्या कर्मचार्‍यांनी 42.30 तास बंद असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तब्बल 32 तास अथक परिक्षम घेत वीजपुरवठा सुरळीत केला. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तिसगाव कक्षाचे सहाय्यक अभियंता श्री. हितेशजी ठाकुर साहेब, करंजी विभागाचे सहाय्यक अभियंता श्री. मिश्रा साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधान तंत्रज्ञ माधव पटारे, वरीष्ट तंत्रज्ञ अनिल राजळे, प्रताप नन्नवरे, निलेश उगार, विशाल इंगळे, दीपक वेताळ, राहुल बडवे, आदिनाथ निंबाळकर, अरविंद पाठक, हनुमंत शिंदे, सोमनाथ लवांडे यांच्यासह विशेष सहकार्य संतोष शेळके, केरुबापू कर्डिले, ज्ञानेश्वर बर्डे, भारत गायकवाड, गणेश काकडे यांनी अथक परिश्रम घेतले.

कासार पिंपळगाव व भोसे वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा सलग 43 तास खंडीत झाल्याने लाभधारक गावांमध्ये कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली होती. तसेच वीजेअभावी छोटे-मोठे व्यावसाय ठप्प झाले होते. मोबाईल चार्ज नसल्यामुळे संपर्क तुलटला होता. ऐन सनासुदीच्या काळात खंडीत झालेला वीजपुरवठा कधी सुरू होईल? असा प्रश्न निर्माण झाला होता.

मात्र नवरात्रीचा पहिला दिवस असतांनाही महावितरणच्या कर्मचारी व अधिकार्‍यांनी आपले कर्तव्य चोख बजावत 32 तास अथक परिश्रम घेत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. वीजपुरवठा सुरळीत झाल्यानंतर पाणीपुरवठ्यासाठी शेतीचा वीजपुरवठा सुरू करण्यात आला होता. यामुळे वाडीवस्तीवर लोकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply