Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

काळजी घ्या ः कोरोना बाधितांचा आकडा वाढतोय

संगमनेर पुन्हा शंभरी पार । नगर शहरासह राहाता, श्रीगोंदा, पारनेर, राहुरी, शेवगाव, कोपरगावच्या आकडेवारीत वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Oct 10, 2021 • 12:00 AM 2145 views
गेल्या दोन दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घट होत असतांना आज रविवारी एकुण आकडेवारीत पुन्हा वाढ झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 447 कोरोना बाधित आढळले. संगमनेरसह तब्बल 10 ठिकाणच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.

आज आढळलेल्या आकडेवारीत संगमनेर तालुका पुन्हा टॉपवर आला असून संगमनेरची आकडेवारी पुन्हा शंभरी पार गेली आहे. तसेच जिल्ह्यातील राहाता, श्रीगोंदा, पारनेर, कोपरगाव, राहुरी, नगर शहर, शेवगाव, श्रीरामपूर, मिलटरी हॉस्पिटल येथील आकडेवारीत वाढ झाली आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 145, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 226 तर अँटीजेन चाचणीत 76 असे 447 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- संगमनेर 107, राहाता 45, श्रीगोंदा 44, पारनेर 37, कोपरगाव 32, राहुरी 27, नगर शहर 26, नगर ग्रामीण 25, शेवगाव 22, कर्जत 17, अकोले 11, श्रीरामपूर 12, पाथर्डी 11, नेवासा 10, मिलटरी हॉस्पिटल 07, इतर जिल्हा 07, जामखेड 06, भिंगार 01 असे कोरोना बाधित आढळून आले.

दोन दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा घटत असतांना आज पुन्हा हळू हळू वाढ होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply