Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

काळजी घ्या ः कोरोना बाधितांच्या आकड्यात थोडीशी वाढ

राहाता टॉपवर । श्रीगोंदा दुसर्‍या तर संगमनेर तिसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Oct 23, 2021 • 12:00 AM 1462 views
मागील आठवड्यापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकड्यामध्ये घट होत आहे. मात्र आज आढळलेल्या बाधितांच्या आकड्यामध्ये थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे आकडा घटला असला तरी प्रत्येकाने नियम पाळणे गरजेचे आहे. आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 240 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांचा आकडा शुक्रवारच्या तुलनेत 71 ने वाढला आहे. आज राहाता तालुका पहिल्या स्थानावर असून दुसर्‍या स्थानी श्रीगोंदा तर तिसर्‍या स्थानावर संगमनेर तालुके आहेत. मात्र ही आकडेवारी 37 पेक्षा कमी असल्याने चिंता करण्याचे कारण नाही.

काल शुक्रवार पर्यंत जिल्ह्यात तब्बल 3 लाख 53 हजार 122 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी तब्बल 3 लाख 44 हजार 663 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार सुरू असतांना तब्बल 6 हजार 998 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 488 एवढी झाली आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 79, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 124 तर अँटीजेन चाचणीत 37 असे 240 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहाता 37, श्रीगोंदा 33, संगमनेर 26, पारनेर 18, राहुरी 16, नगर शहर 15, कर्जत 14, कोपरगाव 14, नगर ग्रामीण 13, नेवासा 10, इतर जिल्हा 10, शेवगाव 10, अकोले 9, श्रीरामपूर 8, भिंगार 2, जामखेड 2, पाथर्डी 2, मिलटरी हॉस्पिटल 1 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र बाधितांचा आकडा कमी होत असला तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये नियमित मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply