Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

चोरीच्या सव्वा दोन लाख रुपयांच्या दागिन्यांसह आरोपी जेरबंद

श्रीगोंदा पोलिसांनी 7 दिवसात लावला चोरीचा छडा

श्रीगोंदा । वीरभूमी- Oct 23, 2021 • 12:00 AM 1804 views
तालुक्यातील श्रीगोंदा कारखाना येथील एका महिलेच्या घरात घुसून कपाटाची उचकापाचक करून तब्बल 2 लाख 25 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लांबविले होते. पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांनी चोरीचा सात दिवसात जलद तपास करत स्थानिक चोर शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर याला अटक करून त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि.16 ऑक्टोबर रोजी श्रीगोंदा कारखाना येथील रहिवासी मिनाबाई विष्णू बांगर यांनी फिर्याद दिली की, रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरुन नेले होते.

गुन्ह्याचा अधिक तपास करताना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ही घरफोडी शुभम उर्फ मुन्ना तात्या घोडेकर (वय 25, रा. श्रीगोंदा कारखाना, ता. श्रीगोंदा) याने केल्याचा संशय आहे. संशयितास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर व कर्मचार्‍यांनी ताब्यात घेवुन चौकशी करण्यास सांगितले.

अधिक चौकशी केली असता त्याने घरफोडी केल्याची कबुली दिली. आरोपीकडुन सोन्याचे मणी, कानातील झुबे व गळ्यातील गंठण असे 2 लाख 25 हजार रुपये किंमतीचे 50 ग्रॅम वजानाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.

आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी दिली असून त्याच्याकडून आणखीही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस नाईक गोकुळ इंगवले हे करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामराव ढिकले, सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप तेजनकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमित माळी, फौजदार अंकुश ढवळे, पोलीस नाईक गोकुळ इंगवले, हवालदार प्रकाश मांडगे, किरण बोराडे, दादा टाके, अमोल कोतकर यांनी केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply