Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांचा आकडा निच्चांकी स्तरावर

श्रीगोंदा वगळता सर्व ठिकाणीची आकडेवारी 14 च्या आत

अहमदनगर । वीरभूमी- Oct 24, 2021 • 12:00 AM 1672 views
मागील काही दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने कमी होत आहे. आज नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांनी निच्चांकीस्तर गाठल्याने समाधान मिळत आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 140 कोरोना बाधित आढळले.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांचा आकडा शनिवारच्या तुलनेत 100 ने घटला आहे. यामुळे समाधानकार वातावरण निर्माण झाले आहे. आज आढळलेल्या बाधितांमध्ये श्रीगोंदा तालुका पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र ही आकडेवारी 33 एवढी आहे.

तर पारनेर 14, संगमनेर 14 व कर्जत 12 अशी आकडेवारी आहे तर इतर ठिकाणची आकडेवारी 8 च्या आत आहे. तसेच भिंगारची आकडेवारी आजही शुन्यावर असल्याने समाधान मिळत आहे.

काल शनिवार पर्यंत जिल्ह्यात तब्बल 3 लाख 53 हजार 362 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यापैकी तब्बल 3 लाख 44 हजार 889 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर उपचार सुरू असतांना तब्बल 7 हजार 3 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद पोर्टलवर झाली आहे. तर सध्या उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या 1 हजार 470 एवढी झाली आहे.

आज रविवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 78, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 28 तर अँटीजेन चाचणीत 34 असे 140 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- श्रीगोंदा 33, पारनेर 14, संगमनेर 14, कर्जत 12, नगर ग्रामीण 8, राहाता 8, शेवगाव 8, राहुरी 7, कोपरगाव 6, नेवासा 6, इतर जिल्हा 5, जामखेड 4, श्रीरामपूर 4, इतर जिल्हा 3, अकोले 2, नगर शहर 2, मिलटरी हॉस्पिटल 2, पाथर्डी 2 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना बाधितांचा आकडा कमी होत असल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र बाधितांचा आकडा कमी होत असला तरी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये नियमित मास्क लावावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply