Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

आगारातच एसटी बस चालकाने घेतला गळफास

शेवगाव आगारातील धक्कादायक घटना

शेवगाव । वीरभूमी- Oct 29, 2021 • 10:51 AM 6182 views
आगारात उभ्या असलेल्या एसटी बसच्या पाठीमागे दोराच्या साह्याने गळफास घेऊन चालकाने आत्महत्या केल्याची घटना आज शुक्रवारी सकाळी शेवगाव आगारात उघडकीस आली. आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव दिलीप हरिभाऊ काकडे (रा.आव्हाणे खुर्द, ता. शेवगाव) असे आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचार्‍यांनी गुरुवारी संप पुकारला होता. संप असल्याने सर्व बसेस शेवगाव आगारात उभ्या होत्या. यापैकीच आगारात उभी असलेली बस क्र. एमएच. 40, एन 8849 च्या पाठीमागे चालक दिलीप हरिभाऊ काकडे (रा. आव्हाणे) यांनी दोराचे साह्याने गळफास घेतला.

ही घटना शुक्रवारी सकाळी 6:30 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली. दिलीप काकडे हे शेवगाव आगारात चालक म्हणुन कार्यरत होते. संप असल्याने ते गुरुवारी आव्हाणे येथील आपल्या घरी होते. मात्र रात्री 10 वाजेच्या सुमारास घरातून निघून आल्याची माहिती आहे. आगारातील सुरक्षा रक्षकाने दिलीप काकडे यांचा मृतदेह एसटी बसच्या पाठीमागे लटकत असल्याचे पाहिल्यानंतर आरडाओरडा केला.

यानंतर अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह खाली उतरून घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शेवगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply