Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ ‘आमच्याकडे पैसेच नाहीत’... सार्थकच्या उत्तराने पालकमंत्रीही हेलावले! जिल्हा बँकेत सहकार पॅनलचे वर्चस्व; लंके, ढाकणे, काकडे चर्चेत! जिल्हा बँकेत शेतकरी-कष्टकऱ्यांना न्याय देणार : नीलेश लंके जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विखे-थोरात-गडाख गटाचे वर्चस्व संतांचे विचार आचरणात आणावेत; ह. भ. प. डॉ. राजकुमार घुले यांचे आवाहन खरगे यांच्या वक्तव्यावर विखे पाटलांची टीका; ‘राजकारणातील सर्व संकेत मोडीत काढले’ राहुरीतील वाहतूक कोंडीचा प्रश्न दोन दिवसांत मार्गी लावणार; डॉ. सुजय विखे पाटील यांची ग्वाही कोल्हारमध्ये छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारूढ पुतळ्याचे सोमवारी अनावरण पशुधन सर्वेक्षणातून चारा उत्पादनाचा ‘अहिल्यानगर पॅटर्न’ हनुमान टाकळी, कासार पिंपळगाव येथे अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांची धडक कारवाई ज्ञानेश्वर साखर कारखान्याचे १३ लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट : नरेंद्र घुले पाटील साई संस्थानच्या ४८८ कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेत कायम होण्याचा मार्ग मोकळा; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय मोहटादेवी गडावर शारदीय नवरात्रोत्सवाची पारंपरिक पद्धतीने घटस्थापना काँग्रेसमध्ये खळबळ! पारनेर तालुकाध्यक्षांच्या नियुक्तीवरून नाराजी; पदाधिकार्‍यांचे सामूहिक राजीनामे अमरापूरच्या रेणुका माता देवस्थानात घटस्थापनेने नवरात्रोत्सवाचा प्रारंभ

माहिती दिली नाही म्हणुन ग्रामसेवकाला 10 हजारांचा दंड

माहिती अधिकारात मागीतलेली माहिती दिली नाही म्हणुन ग्रामसेवकाला 10 हजारांचा दंड

पाथर्डी । वीरभूमी- Oct 29, 2021 • 03:15 PM 3874 views
पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक बी. के. तिडके यांनी माहिती अधिकारात मागीतलेली माहिती दिली नाही म्हणुन 10 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला आहे. हा आदेश राज्य माहिती आयुक्त, नाशिक यांनी दिला आहे.

पाथर्डी तालुक्यातील धायतडकवाडी येथील नारायण नवनाथ साबळे यांनी दि. 2/7/2021 रोजी माहिती अधिकारात अर्ज करून दि. 31/7/2017 व दि. 2/0/7/2018 या कालावधीतील ग्रामपंचायत कार्यालयात प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल मिळणेबाबत अर्ज केला होता. त्या अर्जावर काय चर्चा व ठराव घेण्यात आला. तसेच ग्रामपंचायत कार्यसुची इतिवृत्तामध्ये काय नोंद करण्यात आली, याबाबतची माहिती जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक, ग्रामपंचायत कार्यालय, धायतडकवाडी यांचेकडे मागितली होती.

मात्र माहिती अधिकारी बी. के. तिडके यांनी माहिती अर्जाला अनुसरुन विहित मुदतीत तसेच प्रथम अपिलाच्या निर्णयानंतरही माहिती दिली नाही. म्हणुन नारायण साबळे यांनी राज्य माहिती आयुक्त, नाशिक यांच्याकडे अपिल केले होते. या अपिलानंतर जन माहिती अधिकारी ग्रामसेवक बी. के. तिडके यांनी दि. 16/8/2017 रोजीची ग्रामसभेची प्रत सादर करीत असल्याचे सांगत हा खुलासा मान्य करून शास्तीची कारवाई करण्यात येऊ नये म्हणुन विनंती करत ग्रामसेभेची प्रत व माहिती पाठविली होती.

मात्र राज्य माहिती आयुक्त, नाशिक यांनी जनमाहिती अधिकारी ग्रामसेवक बी. के. तिडके यांनी अपिलार्थीस त्यांच्या माहिती अर्जास अनुसरुन विहित मुदतीत तसेच प्रथम अपिलाच्या निर्णयाला अनुसरुन देखील माहिती पुरविलेली नाही. यावरून तत्कालीन जन माहिती अधिकारी यांनी अपिलार्थीस माहिती देण्यास हेतूपुरस्सर टाळाटाळ केल्याचे स्पष्ट होते. यामुळे माहिती आयुक्त यांनी ग्रामसेवक बी. के. तिडके यांचा खुलासा अमान्य करत शास्तीची कारवाई केली.

यावरुन माहिती आयुक्त यांनी तत्कालीन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक बी. के. तिडके यांनी अपिलार्थी यांना विहित नमुन्यात व वेळेत माहिती दिली नाही म्हणुन माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 चे कलम 20 (1) अन्वये 10 हजार रुपये दंड ठोठावला आहे.  ही दंडाची रक्कम जन माहिती अधिकारी तथा ग्रामसेवक बी. के. तिडके यांच्या पगारातून मासिक दोन हप्प्यात कपात करण्याचे आदेश प्रथम अपिलीय अधिकारी तथा पाथर्डी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे. हे आदेश नाशिक विभागीय माहिती आयुक्त के. एल. बिश्नोई यांनी दिले आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply