Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेत श्रीगोंद्याचे सात खेळाडू चमकले

जिल्हा रोलर स्केटिंग स्पर्धेत श्रीगोंद्याचे सात खेळाडू चमकले

श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी- Oct 29, 2021 • 03:45 PM 1556 views

श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी-

नुकत्याच भिंगार येथे संपन्न झालेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत श्रीगोंदा येथील सात खेळाडूंनी विशेष कामगिरी केली. या सातही खेळाडूंचे सर्वस्तरातून कौतूक होत आहे.

भारतीय स्केटिंग महासंघ अंतर्गत अहमदनगर जिल्हा रोलर स्केटिंग फेडरेशनच्या वतीने नुकत्याच जिल्हास्तरीय रोलर स्केटींग स्पर्धा भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूल येथे पार पडल्या. या स्पर्धेत श्रीगोंदा येथील सात खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धा गाजवली. दि. 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान वसई-विरार येथे होणार्‍या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी सात विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शौर्य राऊत, आर्यन गोरे, तनुष्का गोरे, ओंकार गोरे, सागर भुयार, सुमित भोसले, श्रुती आनंदकर यांची निवड झाली आहे. या खेळाडूंना जयेश व सिद्धेश आनंदकर या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.

यशस्वी खेळाडूंचे  राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, माजी आमदार राहुलदादा जगताप, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस, नागवडे कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे, नगराध्यक्षा शुभांगी पोटे, उपनागराध्यक्षा मनीषा लांडे, अरुण महाराज महापुरुष, पोपटराव खेतमाळीस, ग्रँडमास्टर संजय आनंदकर, नगरसेवक प्रशांत गोरे यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply