Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

तो वाळूतस्कर पोलीस कर्मचारी निलंबित

पोलिस अधीक्षकांची कारवाई । पोलीस निरीक्षक यादव यांची माहिती

कर्जत । वीरभूमी- Nov 20, 2021 • 02:26 PM 2968 views
कर्जतचे प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना काल शिवीगाळ करून अडथळा निर्माण करणारा पोलीस उपअधीक्षक कार्यालयातील वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याचे निलंबन झाली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शुक्रवारी रात्रीच निलंबनाचे आदेश कर्जत पोलीस उपअधीक्षक कार्यलयास पारित केले आहे.

शुक्रवार, दि. 19 रोजी कर्जतचे प्रांताधिकारी यांनी आपल्या पथकासह अवैध वाळू वाहतूक करणारा टीपर पकडला असता त्या वाहनालगत उभा असणारा पोलीस उपअधीक्षक कार्यलयात कार्यरत असणारा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे याने शिवीगाळ करून थोरबोले यांना अडथळा आणून तो टीपर पळवून नेला होता.

याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात व्हरकटे आणि अज्ञात चालक यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. शुक्रवारी संध्याकाळी उशिरा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यास पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्या आदेशानुसार निलंबन करण्यात आले.

एका सरकारी कर्मचार्‍याने आपले वरिष्ठ अधिकारी असणारे यांनाच शिवीगाळ करून अडथळा निर्माण केल्याच्या घटनेने दोन्ही विभागात मोठी खळबळ उडाली. पोलीस विभाग जनतेचे रक्षक असताना त्यांच्या एका कर्मचार्‍याने वरिष्ठ अधिकार्यास अशी शिवीगाळ करून मज्जाव करने अशोभनीय आहे.


प्रांधिकार्‍यांना शिविगाळ केल्याने महसुल कर्मचार्‍यांचा काम बंद आंदोलनचा इशारा
प्रांताधिकारी डॉ. अजित थोरबोले यांना शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा करणारा वाळू तस्कर पोलीस कर्मचारी केशव व्हरकटे यास तात्काळ बडतर्फ करावे. यासह गुन्हा दाखल करण्यासाठी प्रांताधिकारी आणि तहसीलदार स्वतः उपस्थित असताना झालेला विलंब याचा महसुल अधिकारी आणि कर्मचार्‍यानी तीव्र शब्दात निषेध केला.

तसेच सदर फिर्यादीमध्ये 353 कलम लावण्याची मागणी कर्जत महसुल प्रशासनाच्यावतीने करण्यात आली. सदर मागण्या मान्य न झाल्यास सोमवारपासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी तहसीलदार नानासाहेब आगळे यांना निवेदन देण्यात आले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply