Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

या महामार्गावर द बर्निंग ट्रक

मोठी जिवीतहानी टळली

श्रीगोंदा ग्रामीण । वीरभूमी- Nov 20, 2021 • 02:34 PM 1248 views
श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेलवंडी फाटा शिवारात पहाटेच्या सुमारास राजस्थान वरून बारामतीकडे फरशी घेऊन चाललेल्या ट्रकने पाठीमागील बाजूने अचानक पेट घेतला. यावेळी जवळच्या वस्तीवरील नागरिकांनी प्रसंगावधान राखून बेलवंडी पोलिसांना तात्काळ खबर दिल्याने पोलीस घटनास्थळी आले.

अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या मदतीने ट्रक विझविण्यात आला. ट्रकला आग लागल्याची घटना समजल्यानंतर नागरिकांनी आग विझविण्यास प्रयत्न केल्याने मोठी जिवीतहानी व नुकसान टळले.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार राजस्थान वरून बारामतीकडे फरशी घेऊन चाललेला ट्रक (एम. पी.33, एच 2306) शनिवार दि. 20 रोजी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास बेलवंडी फाटा शिवारात आल्यानंतर ट्रकने अचानक पेट घेतला.

यावेळी ट्रकमध्ये असणारे चालक पवन गुजर, सहचालक रणजित पाल हे गाडीतून उतरल्याने सुखरूप बचावले. बेलवंडी पोलिसांनी अग्निशमन दल पाचारण केले व स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

यामुळे शेजारीच असलेल्या वनविभागाचे जंगल बचावले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळे यांनी सांगितले.

घटनास्थळाच्या जवळ आदिवासी वस्ती असून येथे राहणार्‍या अमोल भोसले या युवकाने ट्रक पेटली असल्याची माहिती बेलवंडी पोलीस ठाण्याला दिली.

वेळेत अग्निशमन आल्यामुळे वनविभागाच्या हद्दीत असणारी झाडे व आदिवासी वस्ती येथे होणारा मोठा अनर्थ टाळला असल्याची चर्चा परिसरात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply