Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू

श्रीगोंदा । वीरभूमी- Nov 20, 2021 • 02:42 PM 1328 views
श्रीगोंदा शहराजवळील घोडेगाव रस्त्यावर आंबील ओढा परिसरात ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची व दुचाकीची समोरासमोर झालेल्या अपघातात राशीन येथे कार्यरत आरोग्य सेवक म्हणुन कार्यरत असलेले नवनाथ विठ्ठल काशीद (वय वर्षे 34) हे जागीच ठार झाले.

तर दुसर्‍या अपघातात निमगाव खलु येथील शेतकरी सतिष किसन कातोरे (वय 51 वर्ष) हे शेतामध्ये ऊसाचे पिकास पाणी देवून पायी घरी येत असताना रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेने त्यांना जोराची धडक दिल्याने गंभीर अपघात होऊन जागीच ठार झाले.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, राशीन येथून ड्युटी संपवून घरी येत असताना श्रीगोंदा-घोडेगाव रस्त्यावर दुचाकी (एमएच. 16 बी.एक्स 8937) येत असताना शुक्रवार दि. 19 नोव्हेंबर रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास अंबालीका कारखान्याकडे जाणारा दोन ट्रेलर ऊसाने भरलेला ट्रॅक्टर (एम.एच.16 बी.एम. 4555) यांची समोरासमोर जोरदार धडक बसून झालेल्या अपघातात नवनाथ विठ्ठल काशीद (वय वर्षे 34, रा. बालाजीनगर, श्रीगोंदा. मुळगाव रा. खर्डा, ता. जामखेड) हे जागीच ठार झाले.

यावेळी ट्रॅक्टर चालक केशव रामभाऊ भोईटे (रा. लिंपणगाव, ता. श्रीगोंदा) याने जखमीस कोणतीही मदत न करता व अपघाताची खबर न देता पोबारा केला. याबाबत मयताचे चुलते शंकर रामचंद्र काशीद यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्टर चालक केशव रामभाऊ भोईटे याच्यावर श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसर्‍या घटनेत निमगाव खलु येथील शेतकरी सतिष किसन कातोरे (वय 51 वर्ष) हे शेतामध्ये ऊसाचे पिकास पाणी देण्यास गेले असताना रात्री साडे अकराच्या दरम्यान वीज आल्याने ऊसाच्या पिकास पाणी देऊन घरी निमगाव खलु येथे पायी येत असताना रेल्वे रुळ ओलांडताना अचानक आलेल्या रेल्वे गाडीची त्यांना जोराची धडक बसल्याने झालेल्या गंभीर अपघातात जखमी होवून जागीच ठार झाले.

याबाबत शिवाजी सतिष कातोरे यांनी दिलेल्या खबरीवरून श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply