Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आमदार मोनिकाताई राजळे यांना अटक

वीजप्रश्नावर केला होता रास्तारोको । वाहनाच्या दुतर्फा रांगा

शेवगाव । वीरभूमी- Nov 29, 2021 • 02:34 PM 9567 views
कृषीपंपाच्या थकित वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेतीपंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. या राज्य शासनाच्या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ रास्तारोको आंदोलन करणार्‍या आ. मोनिकाताई राजळे व भाजपा कार्यकर्त्यांना शेवगाव पोलिसांनी अटक केली आहे.

कृषी पंपाच्या थकीत वीज बिलाच्या वसुलीसाठी महावितरण कंपनीने शेती पंपाचा वीजपुरवठा खंडीत केला जात आहे. महावितरणच्या या जुलमी कारवाईच्या निषेधार्थ शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपाच्यावतीने शेवगाव शहरातील गाडगेबाबा चौकात सोमवारी सकाळी 10.30 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान महावितरणच्या अधिकार्‍यांनी आंदोलकांशी चर्चा केली. मात्र चर्चा मान्य न झाल्याने सकाळी 10.30 वाजता सुरू झालेले आंदोलन दुपारी 2.10 वाजेपर्यंत सुरूच होते. प्रशासनानेही आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र मागणी मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने पोलिसांनी आंदोलकांना अटक केली.

अटक केलेल्यामध्ये आमदार मोनिकाताई राजळे यांच्यासह भाजपाचे तालुकाध्यक्ष ताराचंद लोढे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष बापुसाहेब पाटेकर, शहराध्यक्ष रवी सुरोसे, गंगा खेडकर, नितीन दहिवाळकर, नगरसेवक महेश फलके, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे आदींचा समावेश आहे.

आंदोलकांना अटक करून पोलिसांनी बळजबरीने पोलिस गाडीमध्ये बसवून पोलिस ठाण्यात आणले. पोलिस ठाण्यात आल्यानंतरही आंदोलकांनी घोषणाबाजी करत पोलिस ठाण्याच्या दारातच ठिय्या दिला.

रास्तारोको दरम्यान रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वाहनाच्या रांगा लागल्या होत्या.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply