Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

अखेर भाऊसाहेब घनवट आत्महत्या प्रकरणी तिघांवर गुन्हा

चिठ्ठीत नाव असलेल्या पोलिस अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीवर नातेवाईक ठाम

शेवगाव । वीरभूमी- Nov 30, 2021 • 10:25 PM 7900 views
शेवगाव तहसील कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेत भाऊसाहेब घनवट (रा. नजिक बाभूळगाव) या तरुणाने आत्महत्या केल्याचे मंगळवारी सकाळी उघडकीस आले. दरम्यान भाऊसाहेब घनवट याने लिहिलेली आठ पानी चिठ्ठी सापडली असून त्यामध्ये आपल्यावर कसा अन्याय झाला याचे सविस्तर वर्णन करण्यात आले आहे.

या चिठ्ठीत नावे असलेल्या तीन जणांवर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र चिठ्ठीत नाव असलेल्या पोलिस अधिकार्‍यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये गंगामाई साखर कारखान्यामध्ये नोकरी करणारे विष्णू खेडकर, अर्जुन मुखेकर व जगन्नाथ रघुनाथ झाडे यांची नावे आहेत. मात्र नाव वगळलेला पोलिस अधिकारी कोण? याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आहेत.

नजिक बाभूळगाव येथील भाऊसाहेब ऊर्फ सोमनाथ सर्जेराव घनवट या तरुणाने शेवगाव तहसील कार्यालयासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे मंगळवारी पहाटेच्या सुमारास लक्षात आले. पोलिसांनी मृतदेह खाली तरून उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला होता. दरम्यान पंचनामा करतांना मृतदेहाच्या खिशामध्ये आढ पानी चिठ्ठी आढळून आली.

या चिठ्ठीत भाऊसाहेब घनवट याने आपण कोणत्या कारणाने आत्महत्या करत असून आपल्याला होणार्‍या त्रासातून मुक्त होण्यासाठी जीवन यात्रा संपवत आहोत, याचा स्पष्ट उल्लेख केला आहे. या चिठ्ठीत उल्लेख असलेल्या गंगामाई साधर कारखान्यात नोकरी करणारे विष्णू खेडकर, अर्जुन मुखेकर व जगन्नाथ रघुनाथ झाडे यांची नावे असल्याने यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

मात्र चिठ्ठीत नाव असलेला एक पोलिस अधिकारी याच्यावरही गुन्हा दाखल करावा, सोशल मीडियावर ठेवलेल्या ‘सर्व काही मोबाईलमध्ये’ या स्टेटस असलेल्या मोबाईलची तपासणी करावी, अशी मागणी भाऊसाहेब घनवट यांच्या नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला.

यामुळे तणाव निर्माण झाला होता. तणाव पहाता पोलिसांनी बंदोबस्तासाठी नगर येथून एका पथकाला पाचारण केले. मात्र नातेवाईक रात्री पर्यंत आपल्या मागणीवर ठाम होते.

मयत भाऊसाहेब घनवट यांच्या पश्चात आई, भाऊ, पत्नी, एक छोटी मुलगी असा परिवार आहे. भाऊसाहेब घनवट याने न्याय मिळण्यासाठीच तहसील कार्यालयाच्या गेट समोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेतला असल्याचे बोलले जात आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply