Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

नागवडेसाठी दिग्गजांनी भरले उमेदवारी अर्ज

तिसर्‍या दिवसाअखेर तब्बल 100 अर्ज दाखल

श्रीगोंदा । वीरभूमी- Dec 15, 2021 • 10:22 PM 2775 views
सहकार महर्षी शिवाजीराव नारायणराव नागवडे सहकारी साखर कारखाना निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर अर्ज दाखल करण्याच्या तिसर्‍या दिवशी एकूण 21 जागांसाठी तब्बल 100 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल करण्याची मुदत दि. 17 पर्यंत असल्याने अजून उमेदवारांची मोठी संख्या होणार आहे.

बुधवारी नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी समर्थकांसह मिरवणूक काढून अर्ज दाखल केले. तर विरोधी गटाचे माजी उपाध्यक्ष केशवराव मगर, जिजाबापू शिंदे, भगवानराव पाचपुते यांनी कुठलाही गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज दाखल केले.

श्रीगोंदा कारखान्याचे विद्यमान चेअरमन राजेंद्र नागवडे, बाबासाहेब भोस, भगवानराव पाचपुते, केशवराव मगर, अण्णासाहेब शेलार, प्रेमराज भोईटे, अरुण पाचपुते, सुभाष शिंदे या दिग्गजांनी बुधवारी अर्ज दाखल केले.

राजेंद्र नागवडे यांच्या नेतृत्वाखाली स्व. शिवाजीराव नागवडे किसान क्रांती पॅनलच्या बहुतेक निश्चित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. राजेंद्र नागवडे यांच्याबरोबर मिरवणुकीत अनुराधा नागवडे, बाबासाहेब भोस, दीपक नागवडे, शुभांगी पोटे, बाबासाहेब इथापे, धनसिंग भोईटे, आदेश नागवडे, राकेश पाचपुते, मनोहर दादा पोटे, स्मितल वाबळे व मोठ्या संख्येने सभासद व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.

नागवडे कारखान्याच्या सत्ताधारी संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे बाहेर पडून केशवराव मगर यांनी सर्वपक्षीय नेत्यांची मदत घेत रणशिंग फुंकले आहे. त्यांच्याबरोबर या ना त्या कारणाने राजेंद्र नागवडे यांच्याशी मतभेद असलेले नेते एकजुटीने मगर यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत.

तर सत्ताधारी राजेंद्र नागवडे यांच्या संचालक मंडळात काही संचालक अनेकवेळा संधी मिळाली असल्याने त्यांना डावलून नवोदितांना संधी मिळण्यासाठी मोठी लॉबी कार्यरत झाली आहे. त्यामुळे दोन-तीन वेळा संचालक पद भोगलेल्या संचालकांना उमेदवारी मिळणे कठीण झाले आहे.

राजेंद्र नागवडे यांच्या जमेची बाजू म्हणजे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाबासाहेब भोस खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. नव्हे तर बाबासाहेब भोस सर्व निर्णय घेताना आघाडीवर आहेत. तब्बल 19,841 सभासद बापूंच्या सहानुभूतीने राजेंद्र नागवडे यांना कल देतात का? विरोधी पॅनलचे केशवराव मगर यांच्या पारड्यात मते टाकतात हे येणारा काळच ठरविणार आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply