Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कासवगतीने वाढतोय कोरोना

राहाता व नगर शहर पहिल्या क्रमांकावर

अहमदनगर । वीरभूमी- Dec 18, 2021 • 02:39 PM 685 views
मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा घटत आहे. नियमित घटत असलेल्या बाधितांमुळे जिल्ह्यातील उपचार घेणार्‍या रुग्णांची संख्याही घटली आहे. मात्र दोन दिवसापासून कोरोना बाधितांचा आकडा कासवगतीने वाढू लागला आहे.

आज शनिवारी जिल्ह्यात एकुण 58 कोरोना बाधित आढळले. शुक्रवारी जिल्ह्यात 48 कोरोना बाधित आढळले होते. यामध्ये आज 10 ने वाढ झाली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये राहाता व नगर शहरातील आकडेवारी 10 एवढी आहे. तर शुक्रवारी इतर जिल्हा 7 तर पाथर्डी 5 अशी आकडेवारी होती. वाढत्या आकडेवारीमुळे प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

कोरोना बाधितांचा आकडा घटत असला तरी नव्याने आलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

आज शनिवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 23, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 24 तर अँटीजेन चाचणीत 11 असे 58 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- राहाता 10, नगर शहर 10, नगर ग्रामीण 6, इतर जिल्हा 6, पाथर्डी 6, कोपरगाव 4, श्रीरामपूर 4, श्रीगोंदा 3, अकोले 2, नेवासा 2, शेवगाव 2, कर्जत 1, पारनेर 1, राहुरी 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर जामखेड, संगमनेर, भिंगार, मिलटरी हॉस्पिटल, इतर राज्ययेथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी घटत चालली असली तरी नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. यामध्ये विनाकारण घराबाहेर पडू नये, नियमित मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे, सॅनिटायझरचा वापर करावा आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply