Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

मात्र त्यासाठी माजी मंत्री पिचड यांचे नेतृत्व अमान्य ः मेंगाळ

आदिवासी प्रश्नांवर अकोलेत सहमती एक्सप्रेस

अकोले । वीरभूमी - Dec 27, 2021 • 09:33 AM 870 views
आदिवासी समाजाला आपल्या मूळ संस्कृती चाली रिती रुढी परंपरा या आदिवासी संस्कृती पासून बीरसा ब्रिगेड नावाची संघटना आदिवासी समाजाचे लक्ष विचलित करुन आदिवासी समाजातील सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम करू नका, आपली मूळ संस्कृती ही नाही.

अशा प्रकारचा नविन बागुलबुवा तयार करून बीरसा ब्रिगेड आदिवासी समाजात फूट पाडत आहे, असे माजी मंत्री पिचड यांचे मत आहे. आणि बीरसा ब्रिगेडच्या भूमिकेला आळा घालण्यासाठी सामाजिक मुद्दा करत मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाखाली अकोले तालुक्यातील पिचड विरोधक आदिवासी नेत्यांची एकजूट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

दोन दिवसापूर्वी रंधा येथील घोरपडादेवी मंदिरात पिचड- भांगरे यांची बैठक झाली आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवर आम्ही एकत्र आलो आहोत, अशी भूमिका प्रसार माध्यमातून दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केली. त्यानंतर शिवसेनेचे मधुकर तळपाडे यांनी देखील या दोन्ही नेत्यांच्या सुरात सूर घालून त्यांनी देखील या आदिवासी नेत्यांच्या या प्रश्नांवर सहमती एक्स्प्रेस मध्ये दाखल झाले. मात्र शिवसेनेचे नेते माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी यांच्या सुरात सुर न घालता माजी मंत्री पिचड यांच्या नेतृत्वाला विरोध केला आहे.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, बीरसा ब्रिगेड संघटना आदिवासी समाजात जाऊन अखंड हरिनाम सप्ताह, दशक्रिया विधी, या सहित आदी धार्मिक कार्यक्रम करू नका. आदिवासी संस्कृती पासून समाजाचे लक्ष विचलित करत असल्याचा आरोप माजी मंत्री पिचड यांनी बीरसा ब्रिगेड संघटनेवर केला आहे. मात्र आजवर बीरसा ब्रिगेड संघटनेकडून अशा प्रकारचे काम केल्याचे कोणतेही पुरावे व्यक्तिगत आमच्याकडे आले नाहीत. जर बीरसा ब्रिगेड संघटना चुकीच्या गोष्टी समाजात पसरवत असेल आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर महाराष्ट्रातील आदिवासी समाज या भूलथापांना बळी पडणार नाही.

बीरसा ब्रिगेड संघटना आदिवासी समाजात फूट पाडत असेल, आम्ही देखील त्यांच्या भूमिकेला कडक विरोध करू, असे स्पष्ट केले. मात्र त्यासाठी माजीमंत्री पिचड यांचे नेतृत्व मान्य नसल्याचेही स्पष्ट केले. अकोले तालुक्यात आमची पिचड विरोधक म्हणून ओळख झाली आहे. जनतेने आम्हाला जी काही आजवर समाजकारणात उंची दिली ती पिचड समर्थक म्हणून नाहीतर पिचड विरोधक म्हणून दिली आहे.

त्यामुळे प्रश्न कोणताही असो मात्र पिचड यांच्या नेतृत्वाखाली आम्ही कधी काम करणार नाही. ज्या दिवशी बीरसा ब्रिगेड संघटनेचे असे काही पुरावे मिळतील त्याक्षणी त्या संघटनेच्या भूमिकेला आम्ही देखील विरोध करू. त्यासाठी मंत्री पिचड यांचे नेतृत्व अमान्य असल्याचे मेंगाळ यांनी सांगितले आहे. तशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply