Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

काळजी घ्या ः कोरोना फैलावतोय

पारनेर तालुक्याची चिंता वाढली । नेवासा, श्रीगोंदा दुसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Dec 27, 2021 • 02:38 PM 2144 views
मागील काही दिवसापासून अहमदनगर जिल्हातील कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस घटत होता. यामुळे नगरकरांना दिलासा मिळत होता. मात्र काल सध्या कासवगतीने कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. सोमवार जिल्ह्यात एकुण 79 कोरोना बाधित आढळल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमाचे पालन करणे गरजेचे होत आहे.

आज सोमवारी आढळलेल्या बाधितांमध्ये पारनेर तालुका सर्वोच्चस्थानी असून येथून आकडा 40 एवढा आहे. यामुळे पारनेर तालुकाकरांची चिंता वाढली आहे. त्या खालोखाल नेवासा, श्रीगोंदा तालुक्याची आकडेवारी येते.

तर जिल्ह्यातील श्रीरामपूर भिंगार, मिलटरी हॉस्पिटल व इतर राज्य येथील आकडेवारी शुन्यावर आली आहे. तर अकोले, जामखेड, इतर जिल्हा व पाथर्डी येथील प्रत्येकी आकडा 1 वर आहे.

मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीत झपाट्याने घट होत होती. मात्र मागील आठ दिवसापासून कासवगतीने जिल्ह्यातील आकडेवारी वाढत असल्याने चिंता वाढत आहे. मागील आठवड्यात अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 350 वर आली होती. ती रविवारपर्यंत 425 वर पोहोचली आहे. यामुळे प्रत्येकाने शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

आज सोमवारी आढळलेल्या बाधितांच्या आकडेवारीमध्ये जिल्हा रुग्णांलयाच्या चाचणी अहवालात 63, खाजगी प्रयोगशाळेतील तपासणी अहवालात 14 तर अँटीजेन चाचणीत 2 असे 79 कोरोना बाधित आढळून आले.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- पारनेर 40, नेवासा 6, श्रीगोंदा 6, कर्जत 5, राहाता 4, नगर शहर 3, संगमनेर 3, कोपरगाव 2, नगर ग्रामीण 2, राहुरी 2, शेवगाव 2, अकोले 1, जामखेड 1, इतर जिल्हा 1, पाथर्डी 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर श्रीरामपूर, भिंगार, मिलटरी हॉस्पिटल, इतर राज्य येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply