Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तनपुरे, विखे नंतर नगर जिल्ह्यातील आणखी एका मंत्र्यांना कोरोना

कोणतेही लक्षणे नाहीत । चाचणी मात्र पॉझिटिव्ह

अहमदनगर । वीरभूमी- Dec 30, 2021 • 11:46 PM 2205 views
अहमदनगर जिल्ह्यातील मंत्री प्राजक्त तनपुरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नूतन जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमास बुधवारी हजेरी लावली होती. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

दोन दिवसापुर्वी हिवाळी अधिवेशन संपले. या अधिवेशनादरम्यान काही मंत्री व आमदार यांच्यासह अधिवेशनास उपस्थित कर्मचारी, पोलिस व पत्रकार यांनाही कोरोनाची बाधा झाली होती. वाढता कोरोना संसर्ग विचारात घेत अधिवेशन संपवण्यात आले होते.

या अधिवेशनानंतर बुधवारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज गुरुवारी सकाळी भाजपाचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. याबाबत या दोन्ही नेत्यांनी याबाबत आपल्या ट्विटर अकाऊंटवर माहिती देत संपर्कात आलेल्यांना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली होती.

राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे, आ. राधाकृष्ण विखे यांना कोरोना संसर्ग झाल्यानंतर आता राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनाही कोरोनाची बाधा झाली आहे. याबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर माहिती दिली आहे.

त्यांनी म्हटले आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. मला कोणतेही लक्षणे नाही, तरीही डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. सगळ्यांना या निमित्ताने आवाहन करत आहे, आपण मास्क वापरावा, काळजी घ्यावी, असे आवाहन केले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे बुधवारी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply