Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तुम्ही फक्त साथ द्या, मी लढण्यासाठी तयार

अ‍ॅड. प्रताप ढाकणे । निवडणुकी अगोदरच फुंकले रणसिंग

पाथर्डी । वीरभूमी- Jan 01, 2022 • 09:17 PM 933 views
निवडणुकीतल्या पराभवाची चिंता आम्ही कधीच करत नाही. ज्येष्ठ नेते बबनराव ढाकणे यांच्या संघर्षाच्या शिकवणुकीच्या विचारावर आम्ही वाटचाल करतो. भावनेच्या आहारी जाऊन मते दिल्याचा परिणाम आज तालुका भोगतो आहे. येणार्‍या काळात त्याची पुनरावृत्ती होऊ देऊ नका. तुमच्यासाठी लढताना कधीच मागे सरकणार नाही, परंतु तुम्ही साथ देणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. प्रतापराव ढाकणे यांनी केले.

पाथर्डी तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद गटातील मालेवाडी ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन (18 लाख), कीर्तनवाडी येथे बंधारा भूमिपूजन (15 लाख), खरवंडी येथील दोन शाळा खोल्यांचे भूमिपूजन (18 लाख), जवळवाडी येथील अंगणवाडी लोकार्पण (7 लाख), शाळा खोली भूमिपूजन (9 लाख), बंधारा भूमिपूजन (15 लाख) या कामाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ह.भ.प. हनुमंत शास्त्री महाराज होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, पंचायत समिती सदस्या शिला खेडकर, बाजार समिती संचालक वैभव दहिफळे, अनिल जाधव, सुनील खेडकर, मिथुन डोंगरे, शौकत शेख, सरपंच प्रदीप पाटील, कविता खाडे, अनंता खाडे, विष्णू थोरात, युसुफ बागवान, महादेव जगताप, रावसाहेब पवळे, विश्वास खाडे आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अ‍ॅड. ढाकणे म्हणाले की, पाच वर्षात भालगाव जिल्हा परिषदेच्या गटात प्रत्येक गाव, वाडी-वस्तीसाठी निधी मिळून दिला. सुमारे 9 कोटी रुपयांची विकासकामे प्रत्यक्षात उतरून करून दाखवली. विरोधकांसारखा कागदावरचा निधी आणि हवेतील विकासकामे अशा थापा मारल्या नाहीत. निवडणुकांपुरते या परिसरावर बेगडी प्रेम दाखवून भावनिकतेचे राजकारण आम्हाला जमत नाही.

तीस वर्षे लोकांसाठी कायम रस्त्यावर आहे. निवडणुकीतल्या पराभवाची चिंता करत नाही. घरात बसणार्‍यांपैकी मी नसून, जनतेवरील व मतदारसंघावरील अन्यायाविरोधात संघर्ष करायचे संस्कार आमच्यावर आहेत. भालगाव गटातील विकास कामासाठी प्रभावती ढाकणे यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणून प्रत्येक गावात विकासाची गंगा पोहोचवली.

प्रत्येकाच्या सुख-दुःखात सहभागी झाल्या. पुढच्या दहा दिवसात शस्त्रक्रियेनंतरच्या उपचारानंतर त्या पुन्हा या परिसराचा दौरा करतील. या भागाच्या जिव्हाळ्याचा असणारा पाणीप्रश्नावरून लोकांची दिशाभूल करणार्‍यांना येत्या काळात धडा शिकवा. असे ते शेवटी म्हणाले.

मालेवाडी, किर्तनवाडी, खरवंडी कासार व जवळवाडी येथील कार्यक्रमास ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद लाभला. प्रास्ताविक राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष महारुद्र कीर्तने यांनी केले तर किरण खेडकर यांनी आभार मानले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply