Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

राष्ट्रीय महामार्गावर आयोजित निबंध स्पर्धेचे विजेते जाहीर

विजेत्यांना राष्ट्रीय युवा दिनी होणार बक्षीस वितरण

पाथर्डी । वीरभूमी- Jan 02, 2022 • 10:13 PM 1560 views
कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्ग क्र. 61 बाबत ‘अपेक्षा आणि वास्तव या विषयावर आयोजित खुल्या निबंध स्पर्धेला नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. आपल्या भावना, व्यथा, दुःख व अपेक्षा ही या निमित्ताने निबंधातून जनतेने व्यक्त केल्या.

या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला आहे. तसेच या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंतीदिनी म्हणजेच राष्ट्रीय युवा दिनाच्या दिवशी घेण्यात येणार असल्याची माहिती पाथर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते मुकुंद गर्जे यांनी दिली.

गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग 61 या विषयावर आयोजित खुल्या निबंध स्पर्धा घेत या प्रश्नाला वाचा फोडली. या अनोख्या उपक्रमास तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील अनेक स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धकांनी तालुक्यातील ज्वलंत प्रश्नांवर व रखडलेल्या राष्ट्रीय महामार्ग 61 बद्दल अतिशय तीव्र भावना लिहून व्यक्त केल्या आहेत.

सर्व स्पर्धकांनी या अपुर्ण व दुरावस्था झालेला राष्ट्रीय महामार्ग लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी विनंती केली आहे. सर्व निबंध हे पंतप्रधान कार्यालयात आणि रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांना पाठविण्यात येणार आहे.

या निबंध स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे- प्रथम क्रमांक विभागून - अ- डॉ. अरविंद संतोष नागरे, ब- साहिल अय्युब पठाण, पाथर्डी. क- आश्विनी वेदप्रकाश काळे, अकोले, ड- गायत्री अजय साठे, पाथर्डी.

द्वितीय क्रमांक विभागून- अ-झरीना अकबर शेख (पाथर्डी), ब-ऋषिकेश आदिनाथ शिरसाट (चिंचपूर रोड, पाथर्डी), क- गौरव बाळासाहेब गर्जे (दुलेचांदगाव, पाथर्डी). तृतीय क्रमांक विभागून- अ-नेहा कृष्णा डोईजड (मेन रोड), ब- आकांक्षा पोपट घुले (पाथर्डी), क- गोविंद सोमनाथ बंग (गांधी चौक, पाथर्डी).

या स्पर्धेचे बक्षिस वितरण दि. 12 जानेवारी रोजी होणार आहे. यानिमित्ताने सकाळी 11 वा. रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. हा कार्यक्रम अतिथी मंगल कार्यालय, गर्जे कॉम्प्लेक्स, पाथर्डी या ठिकाणी होणार आहे.

निबंध स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचे तसेच आयोजकांचे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक व आभार व्यक्त होत आहेत.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply