Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ

नगर शहर टॉपवर । संगमनेर दुसर्‍या स्थानावर

अहमदनगर । वीरभूमी- Jan 02, 2022 • 02:50 PM 2579 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या आकडेवारीत आज मोठी वाढ झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 88 कोरोना बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहरातील कोरोना बाधितांचा आकडा टॉपवर आहे. नगर शहरात आज तब्बल 31 कोरोना बाधित आढळले. दुसर्‍या स्थानावर संगमनेरचा क्रमांक लागतो. त्याचप्रमाणे अनेक दिवसापासून 1 वर आकडा असलेल्या पाथर्डी तालुक्यात आज 6 कोरोना बाधित आढळले आहेत.

त्याचप्रमाणे इतर तालुक्यातही आज थोडीशी वाढ झाली आहे. यामुळे नगरकरांची चिंता वाढली असून प्रत्येकाने काळजी घ्यावी, असे आवाहन केले जात आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा एक दिवस कमी तर एक दिवस जास्त असा पाठशिवणीचा खेळ खेळत आहे. मात्र प्रत्येकाने कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 31, संगमनेर 11, इतर जिल्हा 9, पाथर्डी 6, राहाता 6, श्रीगोंदा 6, कर्जत 4, श्रीरामपूर 4, अकोले 2, नगर ग्रामीण 2, शेवगाव 2, कोपरगाव 1, नेवासा 1, इतर राज्य 1, पारनेर 1, राहुरी 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर जामखेड, भिंगार व मिलटरी हॉस्पीटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा वाढू लागल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply