Skip to content
Breaking Live
श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत 30 जणांचे 42 अर्ज दाखल तनपुरेंच्या मनधरणीसाठी चव्हाण, विखे यांचा पुढाकार सावकारी छळाला कंटाळून पुजार्‍याची विषप्राशन करून आत्महत्या एजंटमार्फत आणलेली नवरी लग्नाच्या काही तासांतच फरार

आजची आकडेवारी चिंता वाढवणारी

नगर शहर पहिल्या क्रमांकावर । नगर ग्रामीण दुसर्‍या तर संगमनेर तिसर्‍या स्थानी

अहमदनगर । वीरभूमी- Jan 05, 2022 • 04:03 PM 2186 views
मागील काही दिवसापासून शंभरच्या आत असलेल्या कोरोना बाधितांनी आज शंभरी ओलांडली आहे. आज बुधवारी जिल्ह्यात एकुण आकडेवारीत 115 कोरोना बाधितांची भर पडली असून सर्वच ठिकाणीच्या आकडेवारीत मोठी वाढ झाल्याने चिंता वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहराचा पहिला क्रमांक असून दुसर्‍या स्थानी नगर ग्रामीण तर तिसर्‍या स्थानी संगमनेरचा क्रमांक लागतो. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील जामखेड व मिलटरी हॉस्पिटल वगळता सर्वच ठिकाणच्या आकडेवारीत वाढ झाली आहे.

आज बुधवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 47, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 52 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 16 असे एकुण 115 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 21, नगर ग्रामीण 15, संगमनेर 10, श्रीगोंदा 9, पाथर्डी 8, पारनेर 8, अकोले 7, राहाता 6, शेवगाव 6, श्रीरामपूर 6, भिंगार 4, इतर जिल्हा 4, कर्जत 3, राहुरी 3, इतर राज्य 3, कोपरगाव 1, नेवासा 1 असे कोरोना बाधित आढळून आले. तर जामखेड व मिलटरी हॉस्पीटल येथील आकडेवारी शुन्यांवर आहे.

मागील काही दिवसापासून कोरोना बाधितांची आकडेवारी दररोज शंभरच्या आत राहत होती. मात्र आज एकुण आकडेवारीने शंभरी पार केल्याने चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply