Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच

सलग पाचव्या दिवशी मोठी वाढ । नगर शहरासह राहाता, कोरपरगाव अव्वल

अहमदनगर । वीरभूमी- Jan 09, 2022 • 02:25 PM 2295 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत आजही मोठी वाढ झाली आहे. आज रविवारी जिल्ह्यात एकुण 272 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे वाढत्या आकडेवारीबरोबर नगरकरांचे चिंता कायम वाढत आहे.

मागील सलग पाच दिवसापासून नगर जिल्ह्यातील आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्यात बुधवारी 115, गुरुवारी 156, शुक्रवारी 170, शनिवारी 225 तर आज रविवारी 272 असे सलग पाचव्या दिवशी कोरोना बाधितांच्या आकडेवारीत मोठी वाढ झाली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहर टॉपवर असून शनिवारच्या तुलनेत आजच्या आकडेवारीत घट झाली आहे. मात्र राहाता, कोपरगाव, अकोले, राहुरी, पाथर्डी, शेवगाव येथील आकडेवारी वाढल्याने चिंता वाढली आहे.

मागील पाच दिवसात तब्बल 938 कोरोना बाधित आढळले आहेत. यामुळे सक्रीय रुग्ण संख्येचा आकडा शनिवार पर्यंत 851 एवढा होता. या आकडेवारीत आजही मोठी वाढ होणार असल्याने चिंता वाढली आहे.

आज रविवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 54, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 158 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 60 असे एकुण 272 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 68, राहाता 46, कोपरगाव 24, नगर ग्रामीण 17, अकोले 15, श्रीरामपूर 15, राहुरी 12, पाथर्डी 11, संगमनेर 10, भिंगार 9, शेवगाव 9, श्रीगोंदा 8, मिलटरी हॉस्पिटल 7, इतर जिल्हा 7, पारनेर 6, जामखेड 2, कर्जत 2, नेवासा 2, इतर राज्य 2 असे कोरोना बाधित आढळून आले. तर एकमेव अकोले तालुक्यातील आजची रुग्ण संख्या शुन्यांवर आहे.

मागील दोन दिवसापासून एकुण आकडेवारीने दोनशेचा आकडा पार केला आहे. या तुलनेत डिस्चार्ज होणार्‍या रुग्णांची कमी असल्याने चिंता वाढली आहे. यामुळे नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply