Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार जाफना ते एकरुखे-शिर्डी शक्तीज्योत यात्रेला प्रारंभ पाथर्डीत दिवसाढवळ्या नऊ लाखांची लूट ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानातून आरोग्यसेवेचा जागर दुष्काळी परिस्थितीत संवेदनशीलपणे काम करा : विखे पाटील बाजार समिती ही शेतकरी-व्यापाऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा धरणांच्या लाभक्षेत्रातील सिंचन व सामाजिक-आर्थिक बदलांचे सर्वेक्षण होणार तुमची परीक्षा MPSC-UPSCची, आमची निवडणुकीची ! पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार

पाथर्डी तालुक्यात ओमायक्रॉनचा शिरकाव

पाथर्डी तालुक्यात ओमायक्रॉनचा शिरकाव

पाथर्डी । वीरभूमी- Jan 09, 2022 • 03:36 PM 5659 views
पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील एका 52 वर्षीय महिलेला ओमायक्रॉनची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दराडे यांनी दिली. यामुळे पाथर्डी तालुक्यात ओमायक्रॉनचा शिरकाव झाला आहे.

यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले असून नागरिकांनी भिती न बाळगता सतर्क राहुन काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, पाथर्डी तालुक्यातील डमाळवाडी येथील एका 52 वर्षीय महिलेला कोरोनाची लक्षणे आढळून आली होती. याची तपासणी केली असता या महिलेला ओमायक्रॉनची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या महिलेवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. दराडे यांनी दिली आहे.

ही महिला डमाळवाडी येथे आपली सून व दोन नातवंडासह राहते. या महिलेने कोविड लसीचे दोन्ही डोस पूर्ण केलेले आहेत. तसेच या महिलेच्या सुनेचेही दोन्ही डोस पूर्ण झाले असून तीही कोरोना बाधित झाली आहे.

52 वर्षीय महिलेला ओमायक्रॉन असल्याचा अहवाल आल्यानंतर आरोग्य विभागाने महिलेल्या संपर्कात आलेल्यांची कोरोना तपासणी सुरू केली आहे. मात्र या घटनेने पाथर्डी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

नागरिकांनी भिती न बाळगता कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सध्या या महिलेवर नगर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply