Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

निवडणुकीचे वादातून खुनाचा प्रयत्न

आरोपी कर्डीलेंचा जामीन नामंजूर

अहमदनगर । वीरभूमी- Jan 09, 2022 • 04:31 PM 976 views
पारनेर तालुक्यातील कुरुंद येथील अमोल भाऊसाहेब कर्डीले (वय 33 वर्षे) यास पारनेर पोलिस स्टेशन गुन्हा रजि.नं. 50/2021 भादंवि कलम 307, 326, 323, 324, 147, 148, 149, 504, 506, तसेच भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 व 4/25 या गुन्हा संदर्भात दि. 28/01/2021 रोजी अटक झालेली होती.

कर्डीले यांनी आरोपपत्र दाखल झाल्यानंतर व केस शेसन कमेट झाल्यानंतर जिल्हा न्यायालय अहमदनगर येथे जामिन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता. सदरचा जामिन अर्ज अहमदनगर येथील जिल्हा व सत्र न्यायाधिश एम. आर. नातु यांनी दि. 7/01/2022 रोजी फेटाळला आहे. या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी, अ‍ॅड. सुरेश लगड व अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.

याबाबतची सविस्तर हकीगत अशी, पारनेर तालुक्यातील कुरुंद येथील जयवंत मंजाबा नरवडे (फिर्यादी) वय 55 वर्षे व आरोपी अनिल दशरथ कर्डीले (रा. कुरुंद, ता. पारनेर) हे ग्रामपंचायत निवडणुकीत एकमेकांविरुद्ध उभे राहिले होते. त्यामध्ये फिर्यादी जयवंत नरवडे हे पराभूत झाल्याने, अनिल दशरथ कर्डीले, अमोल भाऊसाहेब कर्डीले, सागर भाऊसाहेब कर्डीले, विवेक उर्फ पिंट्या अरुण कर्डीले, अविनाश निलेश कर्डीले, राजु दत्तु शेळके, राजेंद्र साहेबराव कर्डीले, पंकज अनिल कर्डीले, सुहास गोरख थोरात, आकाश निलेश कर्डीले व रमेश महादु नरवडे (सर्व रा. कुरुंद, ता. पारनेर) या आरोपींनी यातील आरोपी रमेश महादु नरवडे याने दिलेल्या माहितीवरून दि. 19/01/2021 रोजी दुपारी 3.30 वा. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून कार व मोटार सायकलने फिर्यादीचे शेतात नरवडे वस्ती येथे गेले.

यातील फिर्यादी हे त्यांचे कांदयाचे पिकाला खत टाकत असताना “तू आमचे विरोधात निवडणुकीत उभा राहातो काय?” असे कारण काढून फिर्यादीस तलवारीने व काठ्याने मारहाण करून गंभीर जखमी करून जीवे ठार माण्याचा प्रयत्न केला. व साक्षीदार हे सोडविण्यास आले असता यातील आरोपी क्र. 5 अविनाश निलेश कर्डीले याने त्यांना पिस्तुलाचा धाक दाखविला. म्हणून आरोपींविरुद्ध वर नमुद कलमा अन्वये गुन्हा दाखल होऊन आरोपपत्र देखील पारनेर न्यायालयात दाखल होऊन सदरचा खटला जिल्हा व सत्र न्यायालय अहमदनगर येथे कमेट झाल्याने त्या ठिकाणी सदरचे आरोपीने जामिन मिळण्यासाठी अर्ज केलेला होता.

उभय बाजुंचा युक्तीवाद ऐकुन घेऊन न्यायालयाने जामिन फेटाळला आहे. आरोपीस जामिन मंजूर झाल्यास फिर्यादी व साक्षीदाराचे जीवास धोका उत्पन्न होईल. आरोपी विरुद्ध अनेक गुन्हे प्रलंबित आहे, असा युक्तीवाद सरकारपक्षातर्फे (फिर्यादीपक्षातर्फे) करण्यात आला. तो युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीचा जामिनचा अर्ज नामंजुर केला.

या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे अतिरीक्त जिल्हा सरकारी वकील सी. डी. कुलकर्णी, अ‍ॅड. सुरेश लगड व अ‍ॅड. अजिंक्य काळे यांनी काम पाहिले.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply