Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

कोरोना बाधितांचा पुन्हा विस्फोट

नगर शहराची वाटचाल द्विशतकाकडे । राहाता दुसर्‍या स्थानी

अहमदनगर । वीरभूमी- Jan 13, 2022 • 03:19 PM 1965 views
अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत आहे. मागील आठ दिवसापासून कोरोना बाधितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. आज गुरुवारी जिल्ह्यात तब्बल 557 कोरोना बाधित आढळल्याने चिंता वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अहमदनगर शहर द्विशतकाच्या घरात पोहोचले आहे. तर दुसर्‍या स्थानावर राहाताचा क्रमांक लागतो तर तिसर्‍या स्थानी मिलटरी हॉस्पिटल आहे.

जिल्ह्यातील उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या बुधवार पर्यंत 2040 वर पोहोचली होती. आज यामध्ये मोठी वाढ होणार असून हा आकडा 2500 पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. यामुळे वाढत्या आकडेवारीमुळे चिंताही वाढत आहे.

आज गुरुवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 183, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 294 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 80 असे एकुण 557 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 194, राहाता 45, नमिलटरी हॉस्पिटल 42, नगर ग्रामीण 33, इतर राज्य 26, कोपरगाव 25, इतर जिल्हा 23, श्रीरामपूर 22, श्रीगोंदा 21, राहुरी 16, नेवासा 14, संगमनेर 14, पाथर्डी 12, शेवगाव 11, अकोले 10, पारनेर 8, भिंगार 5, जामखेड 4, कर्जत 4 असे कोरोना बाधित आढळून आले.

वाढत्या कोरोना बाधितांमुळे चिंता वाढली असली तरी नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी. नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply