Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

जिल्ह्याची आकडेवारी चिंता वाढवणारी

नगर शहर दोनशे तर राहाता शंभरी पार । सर्वच ठिकाणच्या आकडेवारीत मोठी वाढ

अहमदनगर । वीरभूमी- Jan 14, 2022 • 02:52 PM 2219 views
मागील दहा दिवसापासून अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या वाढत्या आकडेवारीमुळे नगरकरांची चिंता वाढली आहे. आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 795 कोरोना बाधित आढळल्याने चिंताही वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये नगर शहराने द्विशतक गाठले असून राहाता 134 वर पोहोचले आहे. अकोले, कोपरगावनेही फीप्टी पार केली आहे. अनेक दिवसापासून कमी आकडेवारी असलेल्या ठिकाणीही आज मोठी वाढ झाली आहे.

दिवसागणिक नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी झपाट्याने वाढत आहे. यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. तरी नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.

आज शुक्रवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 360, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 310 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 125 असे एकुण 795 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 200, राहाता 134, अकोले 52, कोपरगाव 52, नगर ग्रामीण 47, पारनेर 46, मिलटरी हॉस्पिटल 37, शेवगाव 32, संगमनेर 30, श्रीरामपूर 30, इतर जिल्हा 27, पाथर्डी 27, श्रीगोंदा 26, नेवासा 23, जामखेड 10, कर्जत 9, राहुरी 7, भिंगार 3, इतर राज्य 3 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply