Skip to content
Breaking Live
‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम टेल भागाकडे मुळा पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष

तिसर्‍या दिवशी 91 वर्षाच्या आजींनी उपोषण सोडले

कळसुबाई शिखरावरील मंदिर जीर्णोद्धार व तेथे सुविधा उपलब्धतेसाठी केले आंदोलन

अकोले । वीरभूमी - Jan 17, 2022 • 12:47 PM 831 views
कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार करावा तसेच तेथे येणार्‍या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात व मंदिराचे पावित्र्य राखले जावे, या मागणीसाठी हौसाबाई लक्ष्मण नाईकवाडी या 91 वर्षाच्या वृद्ध महिलेने तहसील कार्यालया समोर तीन दिवसांपासून सुरू असलेले बेमुदत उपोषण वनखात्याच्या लेखी आश्वासनानंतर अखेर आज सायंकाळी मागे घेण्यात आले.

अकोले तहसील कार्यालय समोर शुक्रवार पासुन 91 वर्षीच्या हौसाबाई नाईकवाडी यांनी कळसुबाई शिखरावरील मंदिराचा जीर्णोद्धार व अन्य प्रश्नी बेमुदत उपोषण सुरू केले होते. पहिले दोन दिवस वनविभागाच्या अधिकार्‍यांचे उपोषण सोडविण्यासाठीचे प्रयत्न निष्पळ ठरले. काल रविवारी उपोषणाचा तिसरा दिवस असल्याने उपोषणास बसलेल्या वयोवृद्ध हौसाबाई नाईकवाडी यांची आ. किरण लहामटे,अकोले वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदिप कदम, तहसीलदार सतिष थेटे, राजूर वन परीक्षेत्र अधिकारी राजश्री साळवे यांनी भेट घेऊन मागण्या संदर्भात चर्चा केली.

आ.डॉ. किरण लहामटे यांनी सांगितले की, कळसूबाई शिखरावरील मंदिर परिसर जिर्णोध्दार करण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणार असुन भरीव निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आश्वासन दिले.

आ. डॉ. लहामटे यांनी त्यांना नारळ पाणी दिल्याने अखेर काल तिसर्‍या दिवशी त्यांनी आपले उपोषण सोडले.तर तहसिलदार थेटे यांनीही श्रीमती नाईकवाडी यांची भेट घेऊन त्यांना लेखी पत्र दिले आहे. त्यात म्हटले आहे कि, आपले वय लक्षात घेता आपल्या उपोषणातील मागणी वरिष्ठ कार्यालयाच्या अधिनस्त असल्याने आम्ही संबधीत कार्यालयाशी संर्पकात राहुन नियमानुसार योग्य ती कार्यालयीन कार्यवाही करण्याची दक्षता घेत आहोत.

यावेळी ह.भ.प.तुकाराम महाराज जाधव, राम तळेकर, शिवसेनेचे महेश नवले, प्रदीप हासे, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी काकड, प्रा. बादशहा ताजणे, ह.भ.प. शांताराम पापळ, बाळासाहेब भांगरे आदी उपस्थित होते.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply