Skip to content
SPONSORED Advertisement
Breaking Live
पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम पावसाच्या खंडाच्या कालवधीत पिकाची घ्यावयाची काळजी ‘वृद्धेश्वर’च्या निवडणुकीत आदिनाथ शेतकरी मंडळाचा विजय लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखाना बिनविरोध वृद्धेश्वर साखर कारखान्याच्या दोन जागेसाठी मतदान नगर-पुणे महामार्गावर भीषण साखळी अपघातात 35 जण जखमी श्रीगोंदा रेल्वे स्थानकावरील राख व्यवहारावर न्यायालयाची दखल ‘फ्लाय अ‍ॅश’ प्रकरणात हरित लवादाची नोटीस अकोले नगरपंचायतीची अतिक्रमणांवर धडक कारवाई बाबुजी आव्हाड महाविद्यालयास ‘उत्कृष्ट क्रीडा महाविद्यालय’ पुरस्कार पारनेर तालुक्यात उष्माघाताचा आणखी एक बळी नगरी पोलीस अधिकार्‍याने गाजवली दिल्लीतील ‘सीआरपीएफ’ची परेड पाथर्डीत वारकरी संप्रदायाविषयी आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध शिक्षण क्षेत्रातील भ्रामक जाहिरातींविरोधात ग्राहक पंचायतीचा एल्गार पाथर्डीत उष्माघाताने तरुण शेतकर्‍याचा मृत्यू पाथर्डी तालुक्यातील 79 ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया वेगात भगवानगडाच्या सप्ताहात भक्ती, शिस्त आणि अध्यात्माचा अद्वितीय संगम

जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच

नगर शहराची चिंता वाढली । दुसर्‍या स्थानी नगर ग्रामीण तर तिसर्‍या स्थानी अकोले

अहमदनगर । वीरभूमी- Jan 17, 2022 • 02:34 PM 1949 views
अहमदनगर जिल्ह्यात आज सोमवारी तब्बल 929 कोरोना बाधित आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा वाढताच असून वाढत्या आकडेवारी बरोबरच चिंताही वाढली आहे.

आज आढळलेल्या बाधितांमध्ये अहमदनगर शहराची आकडेवारी 359 पार गेली आहे. तर दुसर्‍या स्थानी नगर ग्रामीण तर तिसर्‍या क्रमांकावर अकोलेचा क्रमांक लागतो. आज राहाता तालुक्याची आकडेवारी घटली आहे.

दररोज वाढत असलेल्या कोरोना बाधित आकड्यामुळे चिंता वाढत चाचली आहे. यामुळे रविवार पर्यंत जिल्ह्यातील अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्या 4083 वर पोहोचला होता. आजही मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित आढळल्याने अ‍ॅक्टिव रुग्णांची संख्याही वाढणार आहे.

नागरिकांच्या बेजबाबदारपणामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी वाढत आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे.

आज सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात आढळलेल्या कोरोना बाधितांमध्ये जिल्हा रुग्णालयाच्या लॅबमधील तपासणीत 567, खाजगी प्रयोगशाळा तपासणीत 175 तर रॅपिड अँन्टिजेन चाचणी अहवालात 142 असे एकुण 187 कोरोना बाधित आढळले आहेत.

आज आढळून आलेली तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे- नगर शहर 359, नगर ग्रामीण 70, अकोले 56, श्रीगोंदा 54, श्रीरामपूर 52, राहुरी 46, राहाता 41, पारनेर 37, मिलटरी हॉस्पिटल 31, भिंगार 30, कर्जत 25, शेवगाव 23, पाथर्डी 22, इतर जिल्हा 21, कोपरगाव 20, नेवासा 19, जामखेड 13, संगमनेर 7, इतर राज्य 3 असे कोरोना बाधित आढळून आले.

कोरोना रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी नियमित मास्क वापरावा, सॅनिटायझरचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करावे व कोरोना प्रतिबंधक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Comments

No comments yet. Be the first to share your thoughts!

Leave a Reply